मुंबई : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातील वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र ही परवानगी फक्त एसटी बससाठी असणार आहे. जिल्ह्याबाहेर एसटी बस सेवा सुरू होणार असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आलं आणि बससेवाही थांबवण्यात आली. त्यामुळे आपल्या मूळ गावी जाण्यासाठी आतुरलेले अनेक चाकरमानी शहरातच अडकून बसले. . मात्र आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी एस बस सेवेला परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी ईपासही गरज नसेल. मात्र खासगी चारचाकी वाहनांसाठी मात्र ईपास आवश्यक असणार आहे.अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी दिली.
.