कोलाड (श्याम लोखंडे ) : बदलत्या काळातील सर्वांगिक गावच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने गोवे मुठवली शिरवली ग्रामस्थ मतदार बंधू आणि भगिनींनी संपन्न झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत सात उमेदवार सुरवातीलाच बिनविरोध निवडून देत उर्वरित दोन जागेवरील उमेदवार हे सर्वाधिक मतांनी निवडून देण्याचा काम गोवे मुठवलीच्या मतदार ग्रामस्थ महिलांनी केले त्यामुळे एक हाती सत्ता ही गावचा सर्वांगीण विकास साधणारी समविचारी राष्ट्रवादी पक्षाच्या ताब्यात दिल्याचा आनंद आ अनिकेत तटकरे यांनी गोवे येथे सरपंच उपसरपंच निवडी प्रसंगी व्यक्त केले.
रोहा तालुक्यातील 15 जानेवारी रोजी संपन्न झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीच्या सरपंच पदाचे पदभार 10 फेब्रुवारी रोजी सरपंच सोडतीनुसार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या प्रक्रियानुसार गोवे ग्राम पंचायत मध्ये सर्वसाधारण पुरुष असल्याने सर्व नवनिर्वाचित सद्स्य तसेच शिरवली मुठवली गोवे ग्रामस्थ यांच्या सहकार्याने या ग्राम पंचायत सरपंचपदी महेंद्रशेठ पोटफोडे व उपसरपंचपदी नितीन जाधव यांची बिनविरोध निवड करत पदभार स्वीकारण्यात आले या प्रसंगी नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांना शुभेच्छा व सदिच्छा भेटीदरम्यात आ अनिकेत तटकरे बोलतांना आनंद व्यक्त करत होते.
यावेळी नवनिर्वाचित सरपंच महेंद्रशेठ पोटफोडे,उपसरपंच नितीन जाधव,सदस्य नरेंद्र पवार ,सौ सुप्रिया जाधव, रंजिता जाधव ,अंजली पिंपळकर, भावना कापसे, निशा जवके,सुमित गायकवाड, मा.सरपंच रामशेठ कापसे,संदेश कापसे,नंदा कापसे,जेष्ठ नेते तानाजी जाधव, विलास पवार संजय मांडलूस्कर, संजय राजीवले, श्रीकांत चव्हाण, राकेश शिंदे, रामचंद्र पवार, निवडणूक अधिकारी अधिकारी गुंड, तलाठी हिंदोळे, ग्राम सेवक शिद, कर्मचारी मयुरी जाधव, रामचंद्र कापसे, आदी गोवे शिरवली मुठवली ग्रामस्थ महिला युवक व युवती समवेत पुढे म्हणाले की खा सुनील तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या परिसरात अनेक विकासाची कामे केल्याचे फळ आज पहावयास मिळत आहे
तसेच विकास कामांचा दांडगा अभ्यासू व्यक्तीमत्व असलेले युवा होतकरू महेंद्र पोटफोडे सारखा सच्चा मनाचा कार्यकर्ता सरपंचपदी बसल्याने खऱ्या अर्थाने शिरवली गावाप्रमाणेच गोवे मुठवली गावचा विकास खा सुनिल तटकरे पालकमंत्री अदिती तटकरे अथवा मी आम्ही या गावचा सर्वांगिक विकास साधण्यास सदैव कटिबद्ध असल्याचे बोलत मुठवली गावाच्या विकासाचा प्रारंभ सरपंच उपसरपंच यांचे चांगले पायगुण म्हणत तालुक्यातील 12 ग्राम पंचायत पैकी गोवे ग्राम पंचायतीला प्रथम विकासाची चालना देत मुठवली येथील स्मशानभूमी शेड उभारणीसाठी दोन लाख नव्यनो हजार रुपयेचा पत्र मुठवली ग्रामस्थांना सुपूर्द करण्यात आले.
गावातील भांडण तंटा सोडून समविचार करत एका कांबल्यावर बसून एकत्रित आल्याची पोच पावती नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांच्या वतीने मिळालेच आवर्जून उल्लेख करत शिरवली बरोबरच गोवे मुठवली या गावांचा विकासासाठी कटिबद्ध रहा असा टोला नवनिर्वाचित सरपंच यांना लगावला तसेच खांब शिरवली प्रमाणेच खांब ते गोवे यामार्गावरील पथदिवे व रस्ता मुबंई गोवे हायवे पर्यंत रखडले आहे ते येत्या कालावधीत पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे शेवटी म्हणाले .
मा. रामशेठ कापसे यांनी आपले प्रारंभी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की खा सुनील तटकरे साहेब राज्याच्या मंत्रिमंडळात असतांना नेहमी गोवे ग्राम पंचायत विकासासाठी झटले येथील आधारभूत शेतकरी वर्गाला महिसदारा नदीचे पाणी शेती कामासाठी मिळाले पाहिजे अशी मागणी करताच या ठिकाणी कोणत्याही क्षणाचा विचार न करता करोड रुपये निधी उपलब्ध करून देत या पात्रात जलसंपदा खात्यामार्फत धरण बांधण्यात आल्याने येथील शेतकरी वर्ग भात पीक घेण्यास यशस्वी ठरत असल्याचे सांगितले,