नागोठणे (महेश पवार) : गुरव समाजातील खेळाडू विविध खेळांमध्ये व विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवीत आहेत ही गुरव समाजासाठी निश्चितच गौरवाची बाब असून त्यात संदीप गुरव याने दिव्यांगावर मात करून क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली व त्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाकडून क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च असा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार(सर्वात्कृष्ट दिव्यांग खेळाडू) हा पुरस्कार मिळविला आहे.
व्हीलचेअर तलवारबाजीत हा पुरस्कार मिळविणारा महाराष्ट्राचा व रायगडचा पहिलाच खेळाडू ठरल्याने एक इतिहास रचला गेला आहे, ही गुरव समाजा साठी अभिमानास्पद बाब असून आत्ता त्याची निवड एप्रिल मध्ये थायलंड देशात होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात झाली आहे. त्याचा नुकत्याच प्रजासत्ताक दिनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते.
एशियन स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल अखिल गुरव समाज संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष,भा.ज.पा. उत्तर-मध्य जिल्हा उपाध्यक्ष,भा.ज.पा. रत्नागीरी सहसंपर्क प्रमुख कोकण विकास आघाडी तसेच चित्रपट सेंसार प्रमुख सदस्य,एअरपोर्ट अथॉरिटी सदस्य नवलजी शेवाळे ह्यांनी प्रत्यक्ष संदीप गुरव यांच्या घरी सदिच्छा भेट घेवून संदिप गुरव यास शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून विशेष असा गौरव करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी अखिल गुरव समाज संघटनेचे पदाधिकारी तसेच नागोठणे गुरव समाजाचे सौ. अनिता गुरव, मिलिंद गुरव, भरत गुरव, अॅड.प्रिया गुरव, सौ.कल्याणी गुरव हे उपस्थित होते. तसेच भेटी दाखल ह्या वर्षाचे गुरव समाजाचे केलेंडर्स नवलजी यांच्याकडून देण्यात आलॆ.
गुरव समाजाच्यावतीने माझा सत्कार होत आहे, ही माझ्या दृष्टीने गौरवाचीच गोष्ट आहे. आजचा हा सत्कार मला कायम स्फुरणच देणार असून येणाऱ्या एशियन स्पर्धेत नक्कीच ठसा उमटवून समाजाचे नाव आणखी मोठेच करण्याचा प्रयत्न करीन असे संदीप गुरव यांनी सांगितले.