ऐश्वर्याची मिस इंडिया ते थेट यूपीएससी पर्यन्त यशस्वी भरारी

नवी दिल्ली : मंगळवारी लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत एकूण २३०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्यातील ८२९ विद्यार्थी अंतिम मुलाखतीसाठी निवडले गेले. यातील ऐश्वर्या श्योराण हे नाव चर्चेत आले आहे. ‘मिस इंडिया’ या सौंदर्य स्पर्धेत अंतिम टप्प्यापर्यंत पोहचलेल्या ऐश्वर्याने यूपीएससीमध्ये ९३ वी रँक पटकावली आहे.

सर्वीविकडेच  ऐश्वर्याचे जोरदार कौतुक होतय . तिच्या चाहत्यांनी हे यश संपादन केल्याबद्दल तिचे भरभरून कौतुक केलेत .  ऐश्वर्या श्योराण ही प्रसिद्ध मॉडेल आहे. ऐश्वर्या श्योराण, फेमिना मिस इंडिया २०१६ ची अंतिम स्पर्धेतील स्पर्धक, कॅम्पस प्रिन्सेस दिल्ली २०१६, फ्रेशफेस विनर दिल्ली २०१५ मधील विविध स्पर्धांबद्दल तसेच यूपीएससीमध्ये भारतात ९३ वी रँक मिळवल्याबद्दल तिच्यावर .शुभेञ्च्यांचा  वर्षाव होत आहे .