नवी दिल्ली : , ऑक्टोबर महिन्यात भारतीय बँका कोसळण्याच्या मार्गावर असतील, कारण भारतीय बँकांमधील एनपीए वाढतच आहे त्यामुळे बँकांना २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.
कोरोना महामारीच्या काळात कंबरडे मोडलेल्या इतर बँकांच्या प्रमुखांप्रमाणेच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मात्र पुढील संकेत दिले आहेत. कोरोनामुळे एनपीए मोठ्या प्रमाणावर वाढेल व सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील बँकांसाठी पुनर्पुंजीकरणाची योजना आणणे आवश्यक होऊन बसले आहे, असे त्यांनी म्हटले होते.
त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असाही लावण्यात येत आहे की, कोरोनामुळे कर्जफेड करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. लोकांनी ३१ ऑगस्टपर्यंत मोरॅटोरियममुळे कर्ज न फेडल्यामुळे एनपीए १२ लाख कोटींच्या जवळ जाईल. कदाचित ते २० लाख कोटीपर्यंतही जाऊ शकेल. म्हणजेच सध्याच्या दुप्पट होईल. तर यापूर्वी माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनीही एनपीए प्रचंड प्रमाणात वाढेल, असे संकेत दिले होते