मुंबई : रिझर्व्ह बॅंकेने नागरिकांना कर्जाचा हप्ता सहा महिने न देण्याची सवलत दिली आहे. अजूनही काही क्षेत्रांकडून या सवलतीस मुदतवाढीची मागणी होत आहे. मात्र, यावर बॅंकेने भाष्य टाळले आहे.
याचा अर्थ मुदतवाढ देण्याच्या मनःस्थितीत बॅंक नाही असा घेतला जात आहे. या सवलतीची मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपत आहे. त्यानंतर कदाचित बॅंक पर्यटन आणि वाहतुकीसारख्या काही क्षेत्रांना अशी सवलत देण्याच्या शक्यतेवर विचार करू शकते.
बहुतांश बॅंका आणि विश्लेषकांनी या सवलतीस मुदतवाढ दिली जाऊ नये असे सांगितले आहे. मुळात ग्राहकांकडूनच या सवलतीचा कमी प्रमाणात वापर होत आहे.