कंटेनर चालकाच्या चुकीने कारचा अपघात; एकाच मृत्यू तर तिघे जखमी

accident
पनवेल (संजय कदम) : पनवेल जवळील जेएनपीटी रोडवर कंटेनर चालकाच्या चुकीमुळे झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील महिलेचा मृत्यू तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
पनवेल शहरातील कल्पतरु रिव्हर्स साईड, तक्का येथे राहणारे संजिवकुमार सिंग (वय ४०) हे त्यांची मारुती कार क्र. MH-46- BA 7471 ने पनवेल जेएनपीटी रोडवर उरणकडे जात असताना सेक्टर ०५ पुष्पकनगर येथे त्यांची कार आली असता एका अज्ञात कंटेनर चालकाने धोकादायकरित्या पार्क केलेली त्याच्या ताब्यातील कंटेनर रस्त्याच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन करून अचानकपणे सुरु करुन लेन कटींग केली.
त्यामुळे पाठीमागून आलेल्या संजीव यांच्या कारची कंटेनरला जोरदार धडक बसली. या अपघातात संजिवकुमार सिंग व त्यांची १० वर्षाची चिमुकली श्रेयषी सिंग हे गंभीर जखमी झाले आहे. तर संजीव यांची पत्नी रश्मी सिंग (वय ३५) हिचा मृत्यू झाला आहे. या घटनेची पनवेल शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे तक्का परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *