पनवेल (संजय कदम) : कंपनीच्या खात्यात पैसे भरून त्याची पोहच पावती आणुन देतो असे सांगुन ते पैसे कंपनीच्या खात्यामध्ये न भरता त्याचा अपहार केल्याप्रकरणी कंपनीच्या सेल्स हेडवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मनोहर चौधरी (वय ५८) यांनी इम्पेरिया प्रोजेक्ट, नेरूळ येथे ३८ लाख १८ हजार ४०० रुपये किमतीचा ५२० चौ. फुट क्षेत्राचा एक ऑफीस स्पेस बुक केला होता. या प्रोजेक्ट मधील सेल्स हेड असलेले आरोपी प्रणव सांमत याने चौधरी यांच्याशी ओळख वाढवुन त्यांच्याशी गोड बोलून त्यांचा विश्वास संपादन केला.
ऑफीस स्पेस खरेदीसाठी असणाऱ्या रकमेपैकी ११ लाख रुपये रोख रक्कम प्रणव यांनी कंपनीचे अकाउंटमध्ये भरून त्याची पोहच पावती आणुन देतो असे सांगुन हि रक्कम चौधरी यांच्याकडून स्विकारली.
मात्र प्रणवने हि रक्कम कंपनीचे अकाउंटवर न भरता स्वतःचे आर्थीक फायद्यासाठी सदर रकमेचा अपहार केला. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.