करोना योद्धा, स्वयंसेवक, योगदानकर्ता म्हणून नाव नोंदविण्यासाठी संकेतस्थळास भेट द्या : जिल्हाधिकारी निधी चौधरी

अलिबाग : संपूर्ण जगात देश, राज्य आणि जिल्हा करोना विषाणूशी लढत आहे. या लढाईत दिवसेंदिवस करून करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. परंतु बरे होणाऱ्यांचे प्रमाणही समाधानकारक आहे. सध्याच्या परिस्थितीत या लढाईसाठी डॉक्टर्स, नर्सेस, पॅथॉलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, ॲनेस्थेस्टिस्ट, आरोग्य कर्मचारी, केटरर्स, पेंटर्स अशा विविध क्षेत्रातील सेवा देणाऱ्या योद्धयांची गरज निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रातील जास्तीत जास्त कुशल नागरिकांनी करोना विरुद्धच्या या लढाईत स्वतःचे नाव करोना योद्धा, स्वयंसेवक, योगदानकर्ता म्हणून नोंदविण्यासाठी जिल्ह्याच्या raigad.gov.in या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आवाहन केले आहे.