कर्जत (गणेश पवार) : कर्जत तालुक्यातील धुळेवाडी येथे मुंबई मधील तिघांनी बाटलीबंद पाण्याची कंपनी टाकली आहे. त्या कंपनीमध्ये घरखर्च चालविण्याचे इराद्याने नोकरी करीत असलेल्या विधवा महिलेच्या असाह्यतेचा फायदा घेऊन तीन मालक आणि मॅनेजर तसेच कंपनी समोरील बंगल्याचा नोकर या सर्वांनी सामूहिक बलात्कार केला आहे. त्यामुळे सदर विधवा महिला सात महिन्यांची गरोदर राहिली आहे. दरम्यान, याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून कर्जत पोलिसांनी तिघांना ताब्यत घेतले आहे.
कर्जत पोलीस ठाणे हद्दीत कडाव जवळील सावेळे ग्रामपंचायत हद्दी मधील धुळेवाडी गावाच्या बाजूला बाटलीबंद पाणी बनविणारी कंपनी आहे. या कंपनीचे तीन मालक असून ते सर्व मुंबई मधील राहणारे आहेत. त्या कंपनीत धुळेवाडी गावातील एक विधवा महिला घरखर्च चालावा म्हणून नोकरी करीत होती. सदर महिलेच्या अहसायतेचा फायदा घेऊन त्या कंपनीचे तीन मालक तसेच मॅनेजर आणि समोरच्या बंगल्यातच केअर टेकर यांनी जानेवारी २०२२ पासून नोव्हेंबर २०२२ पर्यंत सामूहिक बालकर केले. त्या महिलेला रात्री अपरात्री बोलावून वेगवेगळ्या ठिकाणी नेवून तिच्या असहायतेचा फायदा घेऊन बलात्कार केले. सदर विधवा महिला सात महिन्यांची गरोदर राहिली असून त्या महिलेने कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
त्यानुसार कर्जत पोलिसांनी त्या बाटलीबंद कंपनीचे तीन मालक तसेच मॅनेजर आणि समोरच्या बांगलायचा केअर टेकर अशा पाच जणांविरुद्ध बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्या प्रकरणात कर्जत पोलिसांनी पोलीस निरीक्षक के डी कोल्हार यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीचे दोन मालक आणि समोरच्या बंगल्याचा केअर टेकर असे तिघांना अटक केली आहे. तर एक मालक आणि मॅनेजर हे दोघे फरार आहेत.याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गु.र.नं.04/2023 मध्ये भारतीय दंड संहिता कलम.376,376(2),(एफ एन 376(सी), 376(डी ),506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.