कर्जत (गणेश पवार) : कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे.सात पैकी बाळासाहेबांची शिवसेना पक्ष यांनी थेट सरपंच पदाच्या दोन जागांवर यश मिळविले असले तरी बहुमत मात्र एकाच ग्रामपंचायत मध्ये मिळवता आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महाविकास आघाडीच्या बाहेर जावून दोन ग्रामपंचायत मध्ये थेट सरपंच पदाची निवडणूक लढविली आणि तेथे विजय मिळविता आला आहे.तर शेतकरी कामगार पक्षाने कळंब मध्ये ग्रामविकास आघाडी क्या माध्यमातून यश मिळविले.दरम्यान दहीवली तर्फे वरेडी ग्रामपंचायत मध्ये महाविकास आघाडीने बहुमत मिळविले आहे,मात्र थेट सरपंच पद जिंकता आले नाही.
कर्जत तालुक्यातील सात ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले होते.त्यावेळी 88.46टक्के मतदारांनी मतदान केले होते आणि त्या ईव्हीएम मध्ये बंदिस्त झालेल्या मतांची मोजणी आज 20 डिसेंबर रोजी कर्जत तहसील कार्यालयांत झाली. तहसीलदार डॉ शीतल रसाळ,निवासी नायब तहसीलदार विजय राऊत, नायब तहसीलदार एस आर बाचकर आदींच्या उपस्थितीत झाली. सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार होती,मात्र काही मिनिटे उशिरा कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली.कर्जत तालुक्यातील सात ग्रामपंचायत मध्ये थेट सरपंच पदासाठी 20 उमेदवार रिंगणात होते.तर सात ग्रामपंचायत मधील 69 पैकी 15 सदस्य बिनविरोध निवडले गेले होते,त्यामुळे 54 जागांसाठी 148 उमेदवार या निवडणुकीत उतरले होते
दहीवलि मध्ये एका प्रभागात समान मते
दहीवलि तर्फे वरेडी ग्रुप ग्रामपंचायत मध्ये प्रभाग एक मधील अनुसूचित जमाती जागे वरील निवडणूक लढविणार उमेदवार विष्णू वाघमारे आणि दत्ता वाघमारे यांना समसमान 441मते मिळाली.शेवटी चिठ्ठी काढली असता विष्णू वाघमारे हे चिठ्ठीवर निवडून आले.
कर्जत ग्रामपंचायत निवडणूक…
थेट सरपंच पदाचे उमेदवार…
1-कळंब गृप ग्रामपंचायत
विजयी उमेदवार शेतकरी कामगार पक्ष ग्रामविकास आघाडी
प्रमोद कोंडीलकर – 1474
पराभूत उमेदवार
अरुण बदे- राष्ट्रवादी काँग्रेस 1041
रामचंद्र बदे- बाळासाहेबांची शिवसेना 660
2- उकरुळ ग्राम पंचायत
थेट सरपंच
विजयी उमेदवार
नीलिमा योगेश थोरवे -शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 555
पराभूत उमेदवार…
वंदना संतोष थोरवे -राष्ट्रवादी काँग्रेस 436
कोमल गणेश खडे -बाळासाहेबांची शिवसेना
164
3-दहीवली तर्फे वरेडी ग्रुप ग्रामपंचायत
थेट सरपंच विजयी उमेदवार
मेघा अमर मिसाळ -बाळासाहेबांची शिवसेना 1670
पराभूत उमेदवार
नेत्रा निलेश तरे – राष्ट्रवादी काँग्रेस माहविकास आघाडी 1240
वर्षा विष्णू कालेकर -शेकाप 39
4- कोंदिवडे ग्रुप ग्रामपंचायत
थेट सरपंच
विजयी उमेदवार
प्रमोद विश्वनाथ देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी 1028
पराभूत उमेदवार
तानाजी बाबू पाटील – बाळासाहेबांची शिवसेना 738
शालन कासार अपक्ष 19
5- मांडवणे ग्रामपंचायत
थेट सरपंच
विजयी उमेदवार
रंजना बाळकृष्ण सावंत – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 441
6- उकरुळ ग्रामपंचायत
निवडून आलेले उमेदवार
प्रभाग 2
म्हसे पंकज रघुनाथ
मते गणेश मुकुंद
हजारे साधना जनार्दन
प्रभाग 3
गोसावी शिवाजी जानू
सावंत प्रमिला संदिप
थोरवे रुपाली धनंजय
7- कळंब ग्रुप ग्रामपंचायत…
निवडून आलेल्या सदस्यांची नावे
प्रभाग 1
प्रसाद एकनाथ
रंजना निलेश वाघ
प्रभाग 2
बदे ओमप्रकाश शिवराम
निरगुडा निर्मला गणेश
बदे रेश्मा रमेश
प्रभाग 3
प्रकाश काळूराम निरगुडा
मोडक संतोष वसंत
ताईबाई पालू पारधी
प्रभाग 4
आंबो काशिनाथ पारधी
माळी सुगंधा शंकर
लोगडे कनिजा निसार
प्रभाग 5
मस्ते शाहिद सिकंदर
रेवता लहू ढोले