कर्जत (गणेश पवार) : कर्जत नगरपरिषदेने शहरातील २० हजार नागरिकांना मालमत्ता करवाढ बाबत चतुर्थ वार्षिक करवाढ साठी नोटिसा पाठवल्या आहेत. त्याविरुद्ध कर्जतकर नागरिक आक्रमक झाले असून त्यांनी एकत्रितपणे आम्ही कर्जतकर मोहीम हातात घेतली आहे. त्या माध्यमातून पालिकेला शेवटचा अल्टिमेटम देण्यासाठी नागरिक आज कर्जत नगरपरिषदमध्ये पोहचले होते.
दरम्यान,कर्जत नगरपरिषद देखील चुकीच्या पद्धतीने कर आकारणी केली जाऊ नये यासाठी सकारात्मक असून काही दिवसात लेखी आश्वसन दिले जाईल असे सर्व नागरिकांपुढे स्पष्ट करण्यात आले.
कर्जत शहरातील नागरिकांना चतुर्थ वार्षिक मालमत्ता करवाढ बाबत नागरिकांना नोटिसा पाठवण्यात आल्यानंतर शहरातील नागरिक २० डिसेंबर पासून आक्रमक झाले आहेत. त्यानंतर नागरिकांनी पालिकेत येऊन आपल्या समस्या मांडल्या,त्यानंतर आम्ही कर्जतकर म्हणून सर्वांच्या तक्रारी आणि समस्या हरकती यांचे निवेदन पालिकेला दिले आहे. मात्र त्यावर पालिकेकडून कोणतीही माहिती देण्यात येत नसल्याने २६ जानेवारी रोजी आम्ही कर्जतकर शहरातील लोकमान्य टिळक चौकात आंदोलन करणार आहेत.
23 जानेवारी पासून होणाऱ्या तीव्र आंदोलनाची माहिती प्रशासनाला व्हावी आणि त्यापुढील सर्व जबाबदारी आणि परिणामांची जबाबदारी प्रशासन आणि शासन यांची असेल अशा आशयाचे निवेदन आम्ही कर्जतकर यांच्याकडून नागरपरिषदेमध्ये येऊन देण्यात आले. जोपर्यंत कर मुल्यांकनाबाबत कायदेशीर अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत नगरपरिषदेने कर वसुलीचा आग्रह करु नये या विषयावर आंदोलन केले जाणार आहे.
नागरिकांचे निवेदन घेण्यासाठी कर्जत नगरपरिषद मध्ये मुख्याधिकारी हे रजेवर असल्याने उपलब्ध नव्हते. त्यावेळी कार्यलयीन अधीक्षक गोसावी आणि सुदाम म्हसे यांनी नागरिकांच्या प्रतिनिधी यांच्याबरोबर चर्चा केली. त्यावेळी आम्ही कर्जतकर यांच्या वतीने ऍडव्होकेट कैलास मोरे,जेष्ठ कार्यकर्ते प्रवीण गांगल,माजी नगराध्यक्ष राजेश लाड,तसेच रमाकांत जाधव,विनोद पांडे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. त्यावेळी नागरिकांना आंदोलन करण्याची वेळ प्रशासन आणणे नाही अशी ग्वाही पालिकेच्या वतीने जितेंद्र गोसावी आणि सुदाम म्हसे यांनी दिली. त्यावेळी नागरिकांनी शहरात घरपट्टी भरण्याचे आवाहन करण्यासाठी फिरत असलेली रिक्षा तात्काळ बंद करा अशी सूचना करण्यात आली.
हा निर्णय होईपर्यंत कोणत्याही नागरिकाला कराबाबत आग्रह करू नये अशी मागणी यावेळी नागरिकांच्या वतीने करण्यात आली. तर २०२३ हे वर्षे तीन महिन्यात संपणार आहे आणि त्यामुळे चतुर्थ वार्षिक करवाढ बाबत नोटिसा बजावताना २०२३ ते २०२७ या चार वर्षासाठी होणारी करवाढ असा उल्लेख असावा अशी मागणी केली.तर पालिकेने २३ डिसेंबर रोजी तातडीची बैठक घेऊन केलेला ठराव रायगड जिल्हाधिकारी यांना पाठवला आहे. त्याबाबत नागरिकांच्या मागणीनुसार पालिका कोणते निर्णय देण्याची मागणी केली. सादर माहिती २० जानेवारी पर्यंत आम्ही कर्जतकर या नागरिकांच्या फॉर्म कडे प्राप्त झाली नाही तर मात्र २६ जानेवारी रोजी आंदोलन उभे राहील असे स्पष्ट करण्यात आले.
शहरातील ५० टक्के हुन अधिक नागरिकांच्या मालमत्ता मोजमापे घेण्यात आलेली नव्हती त्यामुळे पुढील चतुर्थ वर्षासाठी करण्यासाठी घेतले जाणारी मोजमापे घेताना संबंधित घरांचे फोटो नोटिसीवर असावेत अशी मागणी करण्यात आली. तर घसारा रक्कम मागणारी कर्जत हि राज्यातील पहिली नगरपरिषद असेल अशी खिल्ली या बैठकीत उडविण्यात आली. या सर्व प्रश्नावर पालिका नागरिकांच्या सोबत असून नागरिकांना सहकार्य करणार असून रायगड जिल्हाधिकारी आणि नगररचना विभाग त्यासाठी पात्र व्यवहार करण्यात आला आहे. त्यांचे उत्तर प्राप्त झाल्यानंतर नागरिकनांच्या हिताचा निर्णय अपेक्षित असेल अशी माहिती प्रशासनाचे वतीने जितेंद्र गोसावी आणि सुदाम म्हसे यांनी दिली.
या चराचेत शहरातील विविध भागातील नागरिकांचा सहभाग होता. त्यात अभिषेक सुर्वे,जयेश म्हसे,दिनेश देवधर,अजय वर्धावे,निलेश हरिचंद्र,गणेश डागा,अशोक देशमुख,युसूफ खान,सचिन हुलावळे,प्रमोद जोशी,भरती कांबळे,अरुण पाटील,अमोल जैन,डॉ जंगम,प्रशांत सदावर्तेउमेश भोपतराव,मण्यार, यांच्यासारख्या असंख्य नागरिकांनी चर्च भाग घेतला.