कर्जत (गणेश पवार) : 22नोव्हेंबर रोजी मध्यरात्री झालेल्या मारहाण प्रकरणात आरपी आयचे नेते जगदीश गायकवाड तसेच त्यांचे साथीदार आणि अन्य अनोळखी 25 जणांवर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यात जगदीश गायकवाड यांना कर्जत पोलिसांनी पनवेल येथील जिल्हा सत्र न्यायालयात ताब्यात घेवुन अटक केली.होती.
दरम्यान, या प्रकरणात जगदीश गायकवाड यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती,मात्र कोठडीत पाठविण्या आधी त्यांची आरोग्य तपासणी केली असता जगदीश गायकवाड यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेंव्हापासून पनवेल कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात अतिदक्षता विभाग मध्ये उपचार घेत असलेले जगदीश गायकवाड यांना जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.तर 3 डिसेंबर रोजी न्यायालयाने गायकवाड यांना रुग्णालयात असे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे सुधारित आदेश दिले आहेत.
सोशल मीडियावर कर्जत तालुक्यातील तांबस गावातील तरुणाने आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याबद्दल त्या तरुणाला जाब विचारण्यासाठी आरपीआयचे नेते जगदीश गायकवाड हे 22 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री पनवेल येथून कर्जत येथे आले होते. त्यावेळी त्यांचे सोबत 25 जण उपास्थित होते. त्यावेळी झालेल्या हाणामारीत तिघे गंभीर जखमी झाले होते. त्याबाबत तांबस येथील सुशील जाधव या तरुणाने कर्जत पोलिसात तक्रार दाखल केल्यावर गुन्हा नोंद झाला होता. एक डिसेंबर रोजी पनवेल न्यायालयातून जगदीश गायकवाड यांना कर्जत पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी साठी कर्जत पोलीस ठाण्यात आणले. त्यावेळी न्यायालयाने जगदीश गायकवाड यांना तीन डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.
कर्जत दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीशांनी जगदीश गायकवाड यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्यांना मेडिकल करण्यासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे आरोग्य तपासणी केली असता गायकवाड यांचा रक्दाब २१० अंश इतका वाढला होता. त्यामुळे डॉक्टरांनी तात्काळ रुग्णालयात हलविण्याची सूचना तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सुर्वे यांना केली. त्यानुसार कर्जत पोलिसांनी रात्री नऊ च्या सुमारास कर्जत पोलीस यांच्या वाहनातून गायकवाड यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केले. तेथे कर्जत पोलिसांचे एक अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांचे पथक तैनात असून कोणत्याही खासगी व्यक्तींना गायकवाड यांना भेटू दिले जात नाही.
मात्र सर्व आरोपींना पकडले गेले. या प्रकरणात जगदीश गायकवाड यांना जामीन मिळण्याची शक्यता कमी होती. तरी देखील तीन डिसेंबर रोजी दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद करीत तब्बल तीन तास सुनावणी झाली आणि त्यानंतर न्यायालयाने जगदीश गायकवाड यांना न्यायालयीन कोठडी नाकारली.आरोपी न्यायालयात असल्याने कर्जत पोलीस यांना त्यांची कोणतीही चौकशी करता आली नाही आणि त्यामुळे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी नाकारली.
त्यावेळी न्यायाधीशांनी निर्णय देताना संबंधित प्रकरणातील सर्व आरोपी यांना लवकरात लवकर पकडण्याचे आदेश पोलिसांना दिले असून जोवर जगदीश गायकवाड यांना डॉकटर रुग्णालयातून सोडत नाहीत,तोवर पोलीस कोठडी कायम ठेवण्यात येईल आणि त्यानंतर पोलिसांच्या चौकशीला सामोरे जाताना पोलिसांना सहकार्य करावे लागेल अशी सूचना न्यायालयाने आरोपी पक्षाच्या वकिलांना केली.
त्यामुळे पुढील काळात जगदीश गायकवाड यांचा मुक्काम रुग्णालयात असला तरी त्यांची पोलीस कोठडी कायम असून पोलीस कोठडीतच जगदीश गायकवाड यांची चौकशी होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे.त्यामुळे आरपीआय चे बडे नेते यांची पोलीस कोठडी कायम ठेवली असून त्यांना तूर्तास तरी सुटकेचा दिलासा न्यायालयाने दिलेला नाही.