कर्जत : वर्णे वाडी येथील तरुणांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

karjat-shivsena3
कर्जत (गणेश पवार) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात वर्णे वाडी येथील तरुणांचा उपजिल्हाप्रमुख नितीन नंदकुमार सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत आज जाहीर प्रवेश झाला.
दिनेश देशमुख, हेमंत बडेकर, तेजस इंगळे, जगदीश दिसले यांच्या पुढाकाराने सदरचा प्रवेश मार्गी लागला असून गुरुनाथ उघडा, सुनील उघडा, नारायण उघडा, राजा उघडा, समीर उघडा, अशोक उघडा, दिपक उघडा, तेजस उघडा, बारकू उघडा, भूषण उघडा, निलेश उघडा, भारत उघडा, बाबू उघडा, करण उघडा, दिलीप उघडा, रामदास उघडा, भरत उघडा, समीर उघडा, राजू उघडा या युवकांचा प्रवेश आज पार पडला. कर्जत तालुकातील अनेक गावातील तरुणांचा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे तसेच माजी पर्यटन मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्याकडे कर्जत तालुक्यातील विविध भागातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे कल दिसून येत आहे.
नितीन नंदकुमार सावंत यांनी उपजिल्हाप्रमुख पदाची सूत्र हाती घेतल्यापासून शिवसेनेत आनंदाचे वातावरण असून पक्षवाढीसाठी ते विशेष लक्ष घातले आहे. या पक्ष प्रवेशाला उपजिल्हाप्रमुख नितीन नंदकुमार सावंत, तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, तालुका संघटक बाबू घारे, कर्जत तालुका युवासेना सचिव अ‍ॅड.संपत पांडुरंग हडप, उपतालुका संघटक दिनेश देशमुख, जिल्हा परिषद संघटक अजय शिंगटे, पंचायत समिती संघटक एकनाथ कोळंबे, उपशहर संघटक अभिजित बडेकर, शाखाप्रमुख रघुनाथ कोळंबे, भिसेगाव शाखाप्रमुख तेजस इंगळे, युवानेते जगदीश दिसले हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *