कर्णकर्कश्य आवाज करणाऱ्या 47 सायलेन्सरवर वाहतूक शाखेने फिरवला रोडरोलर

police-cylencer
पनवेल (संजय कदम) : कर्णकर्कश्य आवाज करणाऱ्या 47 सायलेन्सरवर रोडरोलर फिरवून ते नष्ट करण्याची कारवाई छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आज पनवेल वाहतूक शाखेने केली आहे.
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करताना नवी मुंबईचे पोलिस आयुक्त बिपीनकुमार सिंह, वाहतूक पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल वाहतूक पोलिस शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय नाळे आणि पथकाने कर्णकर्कश्य आवाज करणाऱ्या दुचाकी वाहनांवर कारवाई करून त्यांचे सायलेन्सर जप्त करण्यास वाहतूक शाखेने सुरुवात केली आहे.
या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या सर्व सायलेन्सरवर रोड रोलर चालवून ते नष्ट करण्यात आले आहेत. जवळपास 47 सायलेन्सर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आज सकाळी नष्ट करण्यात आले आहे. या कारवाई वेळी पनवेल वाहतूक पोलिस शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय नाळे, पोलीस उपनिरिक्षक खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक जाधव, पोलीस हवालदार श्रीगणेश, पो.ना.हनुमान आंधळे, पो.शि.बादल यांच्यासह नागरिक उपस्थित होते. तसेच यापुढे देखील कर्णकर्कश्य आवाज करणाऱ्या सायलेन्सर वर कारवाई सुरूच राहील अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय नाळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *