कर्नाळा विभागातील प्रकल्पग्रस्त एकवटले ! महामार्गावरील विकास कामे आणि टोल नाक्यावर प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्याची संघटनेची मागणी

kharpada
पनवेल (संजय कदम) : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम होत असताना या महामार्गात अनेक प्रकल्पग्रस्त बेघर आणि भूमिहीन झाले आहेत असे असतानाही या महामार्गाच्या विकास कामांमध्ये प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत असल्याचे सांगत कर्नाळा विभागातील महामार्ग प्रकल्पग्रस्त एकवटले असून ‘कर्नाळा विभाग महामार्ग प्रकल्पग्रस्त विकास संघटना’ या नावाने संघटना स्थापन करण्यात आली आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गातील बाधित प्रकल्पग्रस्तांचे नेतृत्व करणारे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही संघटना स्थापन करण्यात आली असून रविवारी चार डिसेंबर रोजी खारपाडा नाका येथे या संघटनेची बैठक पार पडली यावेळीअध्यक्ष जनार्दन कोळी यांनी संघटनचे उद्देश प्रकल्पग्रस्तांसमोर मांडून प्रत्येक महामार्ग प्रकल्पग्रस्ताने संघटनेचे सदस्य होण्याचे आवाहन केले.
 महामार्गाच्या विकास कामांमध्ये (उदाहरणार्थ हरितिकरण, रंगरंगोटी, वृक्ष लागवड, साईड पट्ट्या दुरुस्त करणे, काँक्रीट काम करणे) यासारख्या कामांमध्ये सहठेकेदार किंवा कामगार म्हणून महामार्ग प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्यात यावे, खारपाडा टोलनाक्यांवर लागणा-या मनुष्यबळासाठी प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्यात यावे. आणि महामार्ग प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी त्यांच्या उपस्थितीत लवकरात लवकर प्रकल्पग्रस्त संघटना प्रतिनिधी व संबंधितांची बैठक बोलवावी अश्या मागण्या संघटनेचे सल्लागार तथा मागदर्शक सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी केली.
प्रकल्प ग्रस्तांच्या मागण्यांबाबत महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना या अगोदर पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष करीत असल्याचे संघटनेचे सचिव राजू परशुराम पाटील यांनी सांगीतले. यावेळी उपाध्यक्ष निवृत्ती भोईर, खजिनदार दीपक पाटील, कार्यकारिणी सदस्य अनिल पाटील निलेश कोळी,जयेंद्र कोळी, प्रेम पाटील, व यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. संघटनेची पुढील बैठक 11डिसेंबर 2022 रोजी घेण्यात येईल असे सर्वानुमते ठरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *