उरण (विठ्ठल ममताबादे) : विकास कामांसाठी अग्रेसर असणारे, प्रकल्पग्रस्त व कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारे झुंजार नेते रायगड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी बुधवार दिनांक ०४ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वा. IOTLच्या व्यवस्थापना बरोबर धुतुम गावातील प्रकल्पग्रस्त कामगारांच्या पगारामध्ये असलेल्या तफावती संदर्भात कंपनीचे व्यवस्थापन व कंत्राटदार यांच्या सोबत पगाराची तफावत तातडीने कमी करा असे सांगितले.
शेवटी सर्व प्रकल्पग्रस्तांनी कंपनीसाठी जमीन दिलेल्या आहेत. तरी त्यांच्या पगारासाठी वेगवेगळा न्याय देता येणार नाही. प्रकल्पग्रस्तांच्या त्यागावर या कंपनीचे वैभव उभे आहे. त्यांच्यावर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही.असा सज्जड इशारा कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिला.
तसेच धुतुम ग्रामपंचायत मधील नागरी सुविधांसाठी कंपनीने आपल्या CSR फंडाचा मुबलक प्रमाणात वापर करावा असेही सांगितले.यावेळी धुतुम ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य, प्रकल्पग्रस्त शेतकरी, कॉंग्रेस कमीटीचे अध्यक्ष शंकरशेठ ठाकूर, प्रेमनाथ ठाकूर, कामगार वर्ग तसेच कंपनी व्यवस्थापना तर्फे भुपेश शर्मा,मिलिंद मोघे, संदिप काळे उपस्थित होते.