पेण (गणेश म्हात्रे ) : पनवेल तालुक्यातील रसायनी एम.आय.डी.सी., चावणे विभागातील ह्युडाई मोटर कंपनीचे मोबीस इंडिया स्पेअर पार्ट्सच्या गोडावूनमध्ये सहा वर्षाषापासून काम करीत असलेल्या ६८ कामगारांना कामावर येण्यास मनाई केल्याने उर्वरीत कामगारांनी काम बंद अंदोलन सुरु केले आहे. माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन कंपनी प्रशासनाच्या विरोधात तक्रार केली आहे.
याबाबतीत माहिती अशी की. रसायनी एम.आय.डी.सी., चावणे विभागातील ह्युडाई मोटर कंपनीचे मोबीस इंडिया स्पेअर पार्ट्सच्या गोडावूनमध्ये १२२ कामगार सहा वर्षाषापासून काम करीत होते. व्यवस्थापनाने अचानकपणे कंपनीच्या कंपनीच्या नोटिस लावून फक्त ५४ कामगारांनीच कामावर हजर राहण्यास सांगितल्याने ने सर्व कामगार एकत्र येवुन जोपर्यंत १२२ कामगारांना कामावर घेत नाही तो पर्यंत कंपनी चालु न करण्याचा निर्णय घेतला आहे.
या कामगारांवर होणा-या अन्यायाला न्याय देण्यासाठी माजी आमदार आणि शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर व आमदार महेंद्र थोरवे यांनी मा.उद्योग मंत्री श्री.सुभाष देसाई यांची मंत्रालय येथे तातडीने भेट घेवुन या कामगारांना न्याय देण्याबाबत विनंती केली आहे.
उद्योग मंत्र्यांनी मंगळवारी संबंधीत विभागाचे अधिकारी व कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन ह्युडाई मोबीज इंडिया या कंपनीने सर्व कामगार कामावर घेण्यात यावे तसेच कोणत्याही कामगाराची नोकरी जाऊ नये अशा सूचना कंपनी व्यवस्थापनाला केल्या असून कंपनी व्यवस्थापनाला पुढील दोन दिवसात निर्णय घेण्याचा अवधी दिला आहे.
मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीसाठी माजी आमदार आणि शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर, आ. महेंद्र थोरवे, कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर, कामगार उपायुक्त पवार, युनियन प्रतिनिधी रोहित विचारे, कंपनी व्यवस्थापन डेपो हेडकाम एच आर, विशालसाळुंखे व महेश सोनवणे उपस्थित होते.