पनवेल (संजय कदम) : संपूर्ण कामोठे वसाहतीमध्ये अजूनही अनियमित व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने वाढती वसाहत व लोकसंख्या लक्षात घेऊन या ठिकाणी नव्याने पाण्याची टाकी उभारावी अशी मागणी शिवसेना (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी सिडकोचे मुख्य अभियंता यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात शिवसेना उपशहर प्रमुख सचिन त्रिमुखे यांनी शहर प्रमुख राकेश गोवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको मुख्य कार्यकारी अभियंता चोथानी व प्रशांत चेहरे यांची भेट घेतली यावेळी शिवसेना विभाग प्रमुख बबन गोगावले, शिवसेना विभाग संघटक संजय जंगम, शिवसेना पनवेल विधान सभा संघटिका रेवती ताई सपकाळ, शिवसेना पनवेल उप तालुका संघटिका मीनाताई सदरे, शिवसेना कामोठे शहर संघटिकासंगीता राऊत, उपशहर संघटिका सुरेखा जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिवसेना उपशहर प्रमुख सचिन त्रिमुखे यांनी सांगितले की, गेल्या ५ महिन्यांपासून संपूर्ण कामोठे शहरात अनियमित आणि कमी पाणी पुरवठा होत असून सेक्टर १६,१७,१८,३४,३५ आणि ३६ मध्ये तर सलग दोन दोन दिवस पाणी येत नसून नागरिक खूप त्रस्त आहेत. अजून पण सोसायटी मध्ये नियमित पाणी येत नाही आणि खूप कमी प्रमाणात पाणी येत आहे आणि दिवसातून फक्त १ ते २ तास पाणी येत आहेत रोज आमच्या कडे तक्रारी येत असून रोज टँकर चे पाणी विकत घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
कामोठे मध्ये पाणीचा प्रश्न सुटण्यासाठी सिडकोची कामोठे मध्ये एकच पाण्याची टाकी आहे त्यामुळे कधी पाण्याच्या टाकीचे काहीही काम निघाले कि पाणी एक ते दोन दिवस कामोठे मध्ये पाणी येत नाही आणि कामोठे पहिले लोकसंख्या खूप कमी होती आता तीच लोकसंख्या दुपटं झाली आहे ती त्यामुळे नागरिकांना खूप त्रास होतो म्हणून विनंती आहे कि कामोठे मध्ये अजून एक नवीन पाण्याची टाकी उभारावी तसेच पाणी सोडायची वेळ सकाळी आणि संध्याकाळी एकच ठेवावी त्यामुळे प्रत्येक सोसायटी ला कळेल कि आणि किती वाजता चालू करायचे. तरी लवकरात लवकर या निवेदनाची दखल घेऊन कारवाही कारवाई अन्यथा रायगड भवन बेलापूर विभाग कक्ष जवळ २९/१२/२०२२ या रोजी आमरण उपोषण आणि अंदोलनाच्या करण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.