पनवेल (संजय कदम) : कारंजाडे येथे राहणारे अंकित राजेंद्र कांबळे (वय २९) हे राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेले असल्याने त्यांच्या हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
अंकित राजेंद्र कांबळे (वय २९) रंग- काळा, उंची ५ फूट, डोक्याचे केस-काळे, डोळे-काळे, नाक- सरळ, अंगाने मजबूत, अंगात निळ्या रंगाचा टी शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातली आहे.
या इसमा बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्रमांक ०२२-२७४५२३३/७०२१८७६९२९ किंवा पोलीस नाईक एन.बी. माने यांच्याशी संपर्क साधावा