नागोठणे (महेंद्र माने) :: साईनाथ महिला बचत गटाचे शुक्रवार 06 जानेवारी रोजी 21 व्या वर्षात झालेल्या पदार्पनानिमित्त साईनाथ मंदि,रामनगर येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात साईनाथ महिला बचत गटाच्या कार्यक्षम अध्यक्षा व हौशी महिलांच्या एकजुटीचे फळ म्हणजे गटाचे 21 व्या वर्षात पदार्पण असल्याचे प्रतिपादन बँक सखी वर्षा जांबेकर यांनी केले.
कार्यक्रमाची सुरूवात गेली 20 वर्षे गटाच्या अध्यक्षा असलेल्या शोभा फणसेकर यांनी गटाने केलेले कार्य गीतातून तर पदाधिकारी व सदस्यांनी महाराष्ट्र गीतांनी केली.यावेळी उपसरपंच रंजना राऊत,मा. उपसरपंच सुप्रिया महाडीक,ग्रा.पं.सदस्या माधवी महाडीक,बचत गट रोहा तालुका समन्वय अधिकारी नेहा पाटील,आदर्श ग्रामसंघ अध्यक्षा संगीता पोलसानी, क्रांती ग्रामसंघ अध्यक्षा विशाखा धाटावकर,नागोठणे सी. आर.पी.अनीता पवार,वांगणी सी.आर.पी. दीपली गोळे,पळस सी.आर.पी.हेमा डाकी,पिंगोडा सी.आर.पी.पूजा चोरगे यांच्यासह लीलाधर तुरे, सोमेश्वर सोनी,चंद्रकांत भिंगारे,रसिका गोळे,मेघा तटकरे,नीलिमा पवार तसेच विभागातील महिला बचत गट अध्यक्षा व पदाधिकारी उपस्थित होते.
महिलांना मार्गदर्शन करताना वर्षा जांबेकर यांनी या गटामध्ये योग्य निर्णय घेणार्या कार्यक्षम अध्यक्षा तसेच हौशी महिलांच्या एकजुटीमुळे गटाला आज 20 वर्षे पूर्ण होत आहेत. या कालावधीत गट अनेक प्रसंगातून गेल्याची मला कल्पना असून त्यातूनही हा गट कार्यरत असल्याचा मला आनंद आहे.नेहा पाटील यांनी बचत गटाच्या माध्यमातून आम्ही महिला पुरुषांप्रमाणेच एकत्रीत आहोत.एकत्रीत राहिल्याने प्रगति होत असून गटामार्फत कामे भरपूर आहेत फक्त ते समजून घेणे गरजेचे असल्याचे सांगून शासकीय योजनाचा लाभ मिळण्यासाठी गरीब महिलांनाही गटात घेणे अपेक्षित असल्याचे सांगितले. संगीता पोलसानी यांनी महिलांचे अनेक प्रश्न असतात.त्यातून त्यांना पुढे नेण्याचे काम गटातून होत असून त्या आपल्या जिद्दिच्या जोरावर स्वताच्या पायावर उभ्या रहात असल्याचे संगितले.यावेळी पूजा चोरगे,हेमा डाकी,दीपाली गोळे,अनीता पवार यांनीही महिलांना अनमोल मार्गदर्शन केले.
आपल्या प्रस्तावनेत शोभा फणसेकर यांनी महिना 25 रुपये पासून सुरू झालेला हा गट आज प्रत्येकी 200 रुपये बचत करीत आहे. आम्ही दर महिन्याला प्रत्येक सदस्याकडे मासिक सभा असल्याने सर्वांना जमा खर्च व इतर व्यवहाराची माहिती मिळते. गटाचे अध्यक्ष,सचिव व खजिनदार हे गेली 20 वर्षे एकच असून गट चालवीत असताना अनेक अडचणी आल्या होत्या त्यावेळी सर्वांच्या सहमतीने गटाचा वटवृक्ष न तोडता त्याच्या फांद्या छाटून त्याचे पुन्हा पालवीत रूपांतर केले असल्याचे सांगितले. आभार प्रदर्शनात गटाच्या सुप्रिया महाडिक यांनी सर्वांचे आभार मानून आमच्या गटाच्या अध्यक्षा कडक शिस्तीच्या व प्रेमल असल्यामुळेच आम्ही 20 वर्षे पूर्ण करीत असून त्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळत असल्याचे सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साईनाथ महिला बचत गटाचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी अपार मेहनत घेतली.
पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा झाला सत्कार – येथील साईनाथ महिला बचत गटाला 06 जानेवारी रोजी 20 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने घेण्यात आलेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात 06 जानेवारी या पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचे साईनाथ महिला बचत गटासह विविध महिला बचत गटांने श्रीफळ,पुष्पगुच्छ व भेट वस्तु देऊन सत्कार करण्यात आला.