पनवेल (संजय कदम) : तुम्हाला कार खरेदी करून देतो व ती कंपनीला सुद्धा भाड्याने लावून देतो असे सांगून एका भामट्याने दोघा जणांना १३ लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
केशव घरत (रा.काळुंद्रे) यांना व त्यांच्या मित्राला आरोपी विशाल कलगुडे याने ह्युंदाई कंपनीच्या कार करून देणार व त्या कार इंडियन ऑइल कंपनीमध्ये फिक्स लावतो त्याकरिता प्रत्येक कारसाठी दीड लाख रुपये प्रमाणे पैसे भरण्यास सांगून प्रत्येक कारचे महिना ४५ हजार २०० रुपये मिळतील असे आमिष दाखवून त्यांच्याकडून तीन कार खरेदी करण्यासाठी साडे चार लाख रुपये व त्यांचा मित्र याच्याकडून सहा कार खरेदी करण्यासाठी आठ लाख चाळीस हजार रुपये रक्कम घेऊन त्यानंतर त्याने कार न दिल्याने त्याच्याकडे पैसे परत मागितले असता विशालने त्यांच्या सोबत झालेला करार रद्द करण्यासाठी त्यांच्याकडून १५ हजार ६०० रुपये घेऊन कार परत न देता तसेच एकूण १३ लाख ५ हजार ६०० रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.