पुणे : काळी मिरीचे फायदे खूप मोठे आहेत. स्वयंपाक घरात मसाल्याच्या डब्यात काळी मिरी ही असतेच. काळ्या मिरीमध्ये लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक, क्रोमियम, मॅगनीज, व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’ हे अनेक तत्व असतात. काळी मिरीला ‘किंग ऑफ स्पाईस’ असे म्हटलं जाते. काळी मिरी जेवणाचे स्वादच नाही वाढवत तर शरीर निरोगी ठेवण्याचे गुणधर्म आहेत.
1. ज्यांना खोकला येत असल्यास काळी मिरीची पावडर मधामध्ये घेतल्यास त्रास कमी होतो.
2. घश्यात खवखव होत असल्यास गरम पाण्यात काळी मिरी टाकून पाणी प्यावे. खवखव कमी होते.
3. पोटात सूज, पोट फुगणं, अपचन, पोटातील गॅस या सगळ्या समस्यांपासून काळी मिरी सुटका मिळवून देते. 4. काळी मिरी अँटीबॅक्टेरियल, अँटीसेप्टिक असते. जखम लवकर भरण्यास मदत करते.
5. उचकी लागल्यास काळी मिरीची पावडर मध घालून घ्यावी, उचकी थांबते.
6. काळी मिरी नियमित खाल्याने शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही.
7. काळी मिरीची पावडर स्क्रब म्हणून वापर केला जाऊ शकतो. त्वचा चमकते व डेड स्किन निघून जाण्यास मदत करते. 8. काळी मिरीमध्ये अँटीडिप्रेसेंट गुण आहेत. काळी मिरीच्या सेवनाने टेंशन आणि डिप्रेशन दूर करु शकतो.
9. पोटात जंत झाल्या असल्यास काळी मिरीची पावडर खावी. १० काळी मिरी शरीरातील टॉक्सिन्स काढण्यात मदत करते. शरीरातील टॉक्सिन्स घाम, लघवीद्वारे बाहेर काढण्यास मदत करते. शरीरातील युरिक ऍसिड, फॅट, अतिरिक्त पाणी बाहेर काढते.
11. एक चमचा काळी मिरीमध्ये १५.९ कॅलरी, ४.१ ग्रॅम कोर्बोहायड्रेट असतात.
12. काळी मिरी जास्त प्रमाणात खाऊ नये. काळी मिरी उष्ण असते. जास्त खाल्यास पोटात जळजळ होऊ शकते.
13. सॅलड, कोशिंबीरमध्ये मिरपूड भुरभुरावी, ताकात थोडीशी मिरपूड टाकून प्यावे.
डॉ. आदिती पानसंबळ
आहारतज्ञ