कुणाल पाटील यांच्या माध्यमातून अन्नदान

uran2
उरण (विठ्ठल ममलाबादे) : उरण तालुक्यातील पागोटे ग्रामपंचायतचे सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते कुणाल अरुण पाटील हे गेली अनेक वर्षापासून नविन वर्षाच्या निमित्त चिरनेर आश्रमशाळा चिरनेर येथे दरवर्षी आदिवासी विद्यार्थ्यांना अन्नदान करित असतात. याहिवर्षी दिनांक 31/12/2022 रोजी दुपारी 1 वाजता चिरनेर आश्रमशाळा येथे युवा सामाजिक कार्यकर्ते तथा पागोटे ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच कुणाल अरुण पाटील यांच्या माध्यमातून अन्नदान करण्यात आले.
250 विद्यार्थी चिरनेर आश्रमशाळेत शिकत असून या सर्वांनी अन्नदानाचा लाभ घेतला. आजपर्यंत कुणाल पाटील यांनी अनेक गोरगरिबांना मदत केली. उरण तालुक्यातील विविध सामाजिक, सांस्कृतिक धार्मिक उपक्रमांना सढळ हाताने आर्थिक मदत केली आहे.संकटात असलेल्या अनेक लोकांना कोणताही भेदभाव न करता,जात पात पक्ष न बघता मदत केली आहे.
सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या व जनतेच्या अडीअडचणीला धावून जाणाऱ्या कुणाल पाटील यांनी केलेल्या अन्नदान उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
यावेळी रमेश पाटील , महेश पाटील,प्राध्यापक प्रविण पाटील, विनय पाटील , अतिष पाटील, अतुल पाटील, रोशन म्हात्रे , ऋषिकेश म्हात्रे,प्रथमेश तांडेल, प्रणय पाटील, अमित घरत, ऋतिक पाटील, आकाश म्हात्रे, मानस घरत, भारती पाटील, शांता पाटील तसेच चिरनेर आश्रमशाळेचे शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. नवीन वर्षाच्या पूर्व संध्येला कुणाल पाटील यांनी केलेल्या अन्नदानमुळे विद्यार्थी वर्गांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *