‘कु.अर्चिता परब’चं कराटे स्पर्धेत सुयश ! सुवर्ण व कांस्य पदकाची मानकरी

archita
मुंबई (शांताराम गुडेकर) : ९ वी इंटरनॅशनल स्टेट कराटे अँड वेपोन टुरनामेंट २०२२, छावा शिवकालीन बहुउद्देशीय कलामंच (छाया प्रतिष्ठान ) व शोटोकन कराटे -दो,ऑर्गनायझेशन घणसोली, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद स्कूल, सेक्टर २६, नवी मुंबई येथे संपन्न झाली.
या स्पर्धेत, गोरेगाव पूर्व येथे स्थायिक असलेली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, बागतळवडे गावची सुकन्या, अर्चिता परब हिला कुमीटे स्पर्धेत- सुवर्ण पदक व काटा स्पर्धेत कांस्य पदक मिळाले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण व कांस्य पदक देऊन सन्मानीत करण्यात आले .कु अर्चिता ही यशोधाम हायस्कूल ची विद्यार्थीनी असून इ. ६ वी मध्ये शिकत आहे. पंचजन्य मार्शल आर्ट या कराटे संस्थेत गोपाळ शेट्टीगार यांच्या मार्गदर्शनाखाली ती प्रशिक्षण घेत आहे.या पूर्वीही कु अर्चिताने काराटेत अनेक पारितोषिके जिंकली आहेत.
विवेक संकल्प गृह निर्माण संस्थेचे अध्यक्ष-धनंजय पाणबुडे, सचिव-छाया राणे, कोषाध्यक्ष-मनोज खंबाळ व पदाधिकारी यांनी घरी जाऊन कु अर्चिता हिचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *