अलिबाग : आपले सरकार महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण , ठिबक व तुषार सिंचन , फलोत्पादन लागवड, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अशा विविध योजनेंतर्गत दि. 11 जानेवारी 2021 रोजी अर्ज करण्याची अंतिम तारीख होती.
त्याप्रमाणे विविध योजनंच्या लाभाकरिता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले आहेत. सादर केलेल्या अर्जांची राज्यस्तरावर छाननी करून सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार ज्या लाभार्थ्यांच्या मोबाईलवर लघुसंदेश (एसएमएस) आले आहेत त्या लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
तरी लघुसंदेश (एसएमएस) प्राप्त झालेल्या शेतकरी लाभार्थ्यांनी लाभ मिळण्याकरीता अर्ज केलेल्या योजनेसंबंधी सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता महाडीबीटी पोर्टलवर करावी. महाडीबीटी पोर्टल वापरासंबंधी अडचणी /समस्या असल्यास तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले यांनी केले आहे.