अहमदनगर : अमेरिकेत शाळा सुरू केल्यानंतर तेथे मुलांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली होती. यामुळे केंद्र सरकारने 31 ऑगस्टपर्यंत शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे केंद्र सरकारच्या सूचना आल्यानंतरच राज्यात शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नगर येथे बोलताना दिली.
गायकडवाड म्हणाल्या, शाळा सुरू करण्याबाबत पालक व शिक्षण संस्थांचा संमिश्र प्रतिसाद असून स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रित निर्णय घ्यायचा आहे. 10 वी व 12 वीच्या मुलांचे महत्वाचे वर्ष असून त्यांचा ताण कमी करण्यासाठी मुलांसोबत कनेक्टीव्हीटी वाढविण्याबाबत शिक्षकांनी प्रयत्न करावेत.
गायकवाड म्हणाल्या, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नव्या शिक्षण धोरणाबाबत वर्षा गायकवाड म्हणाल्या, यामध्ये काही तांत्रिक अडचणी असून त्यावर मात करावी लागणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यात बैठक घेतली आहे. प्रत्येकवेळी नवीन आयोग, नवीन संस्था स्थापन करण्यापेक्षा असलेल्या संस्थांमधील दोष दूर करून त्या मजबूत केल्या पाहिजेत.