नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री कैलास चौधरी यांच्यानंतर आता केंद्रातील आणखी एक मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. केंद्रीय आयुष मंत्री श्रीपद नाईक कोरोना व्हायरसने पॉझिटिव्ही आढळले आहेत.
श्रीपाद नाईक यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी आज कोविड-19 टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. मी होम आयसोलेशनमध्ये आहे. जे लोक मागील काही दिवसात माझ्या संपर्कात आले, त्यांना सल्ला देण्यात येत आहे की त्यांनी तपासणी करावी, आणि काळजी घ्यावी.