नवी दिल्ली : अमित शाह यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे एम्स रुग्णालयात दाखल केल्याची प्राथमिक माहिती आहे. अमित शाह यांना रात्री 2 वाजता ओल्ड प्रायव्हेट वार्डमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना ठेवण्यात आले आहे. अमित शाह यांची प्रकृती ठीक आहे.
अमित शाह यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. उपचारानंतर दुसऱ्यांदा चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून अमित शाह होम आयसोलेशनमध्ये होते.
अमित शहा यांनी गेल्या आठवड्यात 14 ऑगस्ट रोजी कोरोनामुक्त झाल्याचे स्वतः ट्वीट करून सांगितले होते. मी देवाचे आभार मानतो आणि ज्या लोकांना माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना केली, माझ्या कुटुंबियांना आधार दिला त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो”. मात्र आता पुन्हा त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.