PEN टाइम्स ऑनलाइन टीम : सध्या केसगळती रोखण्यासाठी केवळ मिनोक्सीडिल आणि फिनास्टेराईड या औषधांचा वापर केला जातो. या औषधांचे काही साईडइ फेक्टही आहेत.
परंतु, ब्रिटनच्या मँचेस्टर विद्यापीठातील संशोधकांनी केस गळतीवर ‘वे-३१६६०६’ हे औषध शोधले आहे. ऑस्टियोपोरोसिसच्या म्हणजेच हाडांशी संबंधित आजारावर असलेल्या औषधापासून ते तयार केले आहे. यामुळे केसांची वाढ सुद्धा चांगली होऊ शकते. झङजड बायोलॉजी या मासिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
हे आहेत फायदे
१ मिनोक्सीडिल आणि फिनास्टेराईड औषधांचे साईड इफेक्ट्स टाळता येतील.
२ केस गळतीने त्रस्त असणारांना दिलासा मिळेल.
३ केशप्रत्यारोपणाची गरज भासणार नाही.
(सदरील माहितीची PEN टाइम्स पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)