कोंढाणे धरण क्षेत्रातील आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याचा प्रयत्न; अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा

karjat-adivashi
कर्जत (गणेश पवार) : कोंढाणे धरण क्षेत्रातील अधिकारी आदिवासी शेतकरी यांच्या जमिनी हडप करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्या जमिनींची पाहणी करण्यासाठी खाजगी वाहनातून आलेल्या सरकारी कर्मचारी यांना तेथील आदिवासी शेतकऱ्यांनी अक्षरशः पिटाळून लावले. दुसरीकडे आमच्या आदिवासी जमिनी घेण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही आत्मदहन करू असा इशारा शेतकऱ्यांनी हातात पेट्रोलच्या बॉटल घेऊन केला.
दरम्यन, कोंढ़ाने धरणाबाबत अद्याप कोणत्याही जाहीर घोषणा सरकार कडून करण्यात आलेल्या नाहीत आणि तरीदेखील धरण परिसरातील जमीन पाहण्यासाठी सरकारी अधिकारी कर्मचाहरी येत असल्याने महसूल खात्याच्या कारभाराबद्दल शेतकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कर्जत तालुक्यातील कोंढाणे येथे उल्हास नदीवर धरण बांधले जाणारे आहे. त्या जमिनीबाबत बाहेरील अनेक लोक जमिनी खरेदी करण्यासाठी कोंढ़ाने परिसरात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यात येथील आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करणायचा प्रयत्न सुरु असल्याने शेतकरी संतप्त आहेत. महसूल विभागाचे कोंदिवडे येथील तलाठी हे खाजगी वाहनाने (वाहन क्र. MH 46 P 7693) कोंढाणे धरण परिसरातील शेतजमीमध्ये पाहणी करत होते. त्यावेळी स्थानिक आदिवासी शेतकरी यांच्या निदर्शनास आल्याने आदिवासी शेतकऱ्यांनी त्यांची गाडी अडवून आपण कशासाठी आला आहात असे विचारणा केली. शासकीय अधिकारी व खाजगी व्यक्ति आपले खाजगी वाहनाने पल काढण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु स्थानिक आदिवासी ग्रामस्थ व महिला यांनी गाडीला घेराव घालून पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकारी व दोन खाजगी व्यक्ति यांना विचारपूस केली असता त्यांसकडून उडवा उडवीची व खोटी उत्तरे देवून पल काढण्याचा प्रयत्न करीत होते.
कोंढाणे धरण परिसरात सरकारी कर्मचारी हे तहसीलदार यांच्या आदेशाने गेले असता त्यांनी शासकीय पाहणी दौरा शासकीय वाहनातून होणे आवश्यक होते,परंतु ते खासगी वाहनातून का पाहणी करता? असा सवाल उपस्थित केला/.सध्या कोंढाणे धरण परिसरात संपादित होत असलेल्या आदिवासी शेतनामीनिवर कुळ कायदा अस्तित्वात आल्यापासून कुळ म्हणून असलेल्या आदिवासी शेतकरी यांचा कुळ हटविण्यासंदर्भात दावा दाखल करण्यात आलेला आहे.
कुळ आदिवासी जमिनीचा दावा तहसील कर्जत येथे प्रलंबित आहे.तहसीलदार कर्जत हे आपल्या अधिकाराचा गैरवापर करून कुळ आदिवासी शेतकरी यांच्या शेतजमिनी चुकीच्या पद्धतीने हडप करण्याचा प्रयत्न करीत आहेत.वरील सर्व प्रकार गंभीर असल्याने आदिवासी शेतकरी यांचा जमीन हडप करण्याचा डाव मोडीत काढण्यासाठी आदिवासी शेतकरी यांनी आपल्या हातात पेट्रोलच्या बॉटल आणल्या आहेत.त्यावेळी खासगी व्यक्ती आणि तलाठी यांच्यासमोर स्थानिक आदिवासी हे आक्रमक झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *