कोकण रेल्वे उभारतेय जगातील सर्वात उंच पुल, तो सुद्धा जम्मू-काश्मीरमध्ये, ‘ही’ आहेत वैशिष्ट्ये

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे तयार होत आहे. रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवरील हा पुल आयफेल टॉवरपेक्षा सुमारे 35 मीटर उंच असेल. पुलाची लांबी 1.3 किमी आणि असून रिश्टर स्केलवर 7 किंवा त्यापेक्षा जास्त तीव्रतेच्या भूकंपाला तो तोंड देऊ शकतो. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड हा पुल विकसित करत आहे. कोकण रेल्वेला डोंगर दर्‍यांमध्ये काम करण्याचा अनुभव असल्याने हा प्रकल्प देण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.

हा उधमपुर-श्रीनगर-बारामूला रेल्वे लिंक योजनेचा भाग आहे. बांधकाम पूर्ण होण्याची डेडलाईन ऑगस्ट 2022 आहे. अशाप्रकारचा पुल बनविणे अतिशय अवघड काम आहे. हा काश्मीर खोर्‍याला कटरा आणि देशाच्या इतर भागाला जोडणार आहे. हा तयार झाल्यानंतर जम्मू येथील कटराहून श्रीनगरचा प्रवास 5-6 तासांनी कमी होईल, असे प्रोजेक्ट मॅनेजर डेप्युटी चीफ इंजिनियर आर. आर. मलिक यांनी सांगितले.

सुरक्षेसह अनेक मुद्द्यांमुळे या प्रकल्पाला उशीर झाला असला तरी तो 2022 मध्ये पूर्ण होईल. स्फोट आणि भूकंपविरोधी गुणांसह यामध्ये एक युनिक सिग्नल प्रणाली सुद्धा असेल, जेणेकरून इतक्या उंचीवर वेगवान वार्‍यांचा रेल्वेवर परिणाम होऊ शकणार नाही.

या पुलावर हॅलीपॅडसुद्धा असेल. यामुळे दिल्लीहून लोकांना हॅलिकॉप्टरने येथे येणे शक्य होणार आहे. स्थानिक लोक याची अतुरतेने वाट पहात असल्याचा दावा चिब यांनी केला. वैष्णो देवी मंदिरसाठी प्रसिद्ध जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्याला आशा आहे की, पुल बांधल्यानंतर पर्यटनाला चालना मिळेल, असे रियासी डेप्युटी कमिश्नर इंदु कंवल चिब यांनी सांगितले.