कोकण रेल्वे बंद : बोगद्यात भिंत कोसळली , सर्व गाड्यांचा मार्ग बदलला

पणजी : अरबी समुद्र आणि पश्चिम बंगालचा उपसागरात निर्माण झालेल्या वातावरणीय बदलामुळे मान्सून अधिक सक्रिय झाला त्या  मुसळधार पाऊस सुरू आहे.  त्यामुळे  पेडणे बोगद्यात भिंत कोसळल्याने कोकण रेल्वे ठप्प झाली आहे. रुळावर आलेला मातीचा ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे. पण  बोगद्यात पडलेली माती ढिगारा मोठा असल्याने तो हटवण्यासाठी पुढचे चार ते पाच दिवस लागू शकतील असा अंदाज आहे .

पुढचे चार-पाच दिवस कोकण रेल्वेचा हा मार्ग बंद राहणार असून कोकण रेल्वेच्या अनेक नियमित गाड्या पुणे, मिरजमार्गे वळवण्यात आल्या आहेत, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनानं दिली आहे.