कोलाड (श्याम लोखंडे )कोणतेही कार्य साध्य करण्यासाठी किंवा ती मिळवण्यासाठी संघटित होणे महत्वाचे आहे.असे मत वणी येथील आयोजित काल्याच्या किर्तन सेवेत ह.भ.प. दळवी महाराज गुरुजी यांनी व्यक्त केले.
कृष्ण गोकुळी जन्माला l दृष्टा चलकांप सुटला ll१ll होता कृष्णाचा अवतार l आनंद करिती घरोघर ll२ll सदा नाम वाचे गाती l प्रेमे आनंदे नाचती ll३ll तुका म्हणे हरिती दोष l आनंदाने करिती घोष ll४ll या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या आधारे स्पष्ट करतांना रायगड भुषण ह.भ.प. दळवी महाराज गुरुजी यांनी स्पष्ट करतांना सांगितले कि कृष्णाचा जन्म होताच सर्वत्र आनंदी आनंद झाला त्याच क्षणी कंस मामा याला मात्र संताप झाला याच वेळी गोकुळातील दही,दुध,लोणी, मथुरेला जात होता परंतु तो गोकुळातील लोकांना मिळत नव्हता यामुळे श्रीकृष्णाने सर्व सवंगडी एकत्र करुन सत्याग्रह केला व आपला हक्क मिळवून दिला तसेच मथुरेला जाऊन कंस मामाला मारून तेथील लोकांना न्याय मिळवून दिला.यावेळी काल्याचे महत्व सांगून दहीहंडी फोडण्यात आली.
यावेळी गुरुवर्य ह.भ.प.दत्ताराम महाराज कोल्हाटकर, ह.भ.प विठोबा महाराज मांडळुस्कर,नाना महाराज शिरसे, दिलीप महाराज शिंदे,अनिल महाराज शिंदे,भगवान महाराज कदम,एकनाथ महाराज रेडेकर,विलास महाराज शिंदे,आप्पा रावकर, गायनाचार्य रवी महाराज मरवडे, राम दळवी, काशिनाथ गवंडकर, मुर्दूगमनी संजय म्हसकर, यांच्या सह असंख्य वणी ग्रामस्थ, महिला मंडळ व तरुण मंडळ उपस्थित होते.
तसेच पहिल्या दिवशी ह.भ.प. विठोबा महाराज मांडळुस्कर व ह.भ.प. अनिल महाराज शिंदे यांचे प्रवचन व ह.भ.प. एकनाथ महाराज रेडेकर यांची किर्तन सेवा व दुसऱ्या दिवशी ह.भ.प दळवी महाराज गुरुजी यांच्या किर्तन सेवेनंतर पालखी सोहळ्याचा आनंद घेत मोठया भक्ती भावाने दिड दिवसाच्या किर्तन महोत्सवाची सांगता करण्यात आली.