कोणतेही निवृत्ती वेतन घेत नसलेल्या माजी सैनिक/माजी सैनिक विधवांना केंद्रीय सैनिक बोर्डामार्फत मिळणार पेन्युरी ग्रँटचा लाभ

camando

अलिबाग : केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्यामार्फत 65 वर्षावरील कोणतेही निवृत्ती वेतन नसलेल्या व महाराष्ट्र/ केंद्रीय सरकार अथवा इतर कोणत्याही संस्थेकडून आर्थिक लाभ मिळत नसलेल्या   माजी सैनिक/माजी सैनिक विधवांना  (UP TO HAV किंवा नेव्ही, एअरफोर्सचे तत्सम पदधारक) वार्षिक 48000/-(रक्कम रूपये अठठेचाळीस हजार मात्र) देण्याची तरतूद आहे.  हा  अर्ज  www.ksb.gov.in या संकेतस्थळावर संबंधित मूळ दस्तावेजासह अपलोड  करावयाचा आहे.

 आवश्यक असणारे दस्तावेज पुढीलप्रमाणे सेवापुस्तकाच्या सर्व पानांच्या सुस्पष्ट छायांकित प्रती, माजी सैनिक/माजी सैनिक विधवा ओळखपत्र, वयाचा पुरावा, एस.बी.आय. अथवा पी. एन. बी. बँकेच्या पहिल्या पानांची सुस्पष्ट छायांकित प्रत (खाते नंबर व आय एफ सी कोडसह),आधार कार्ड, गट विकास अधिकारी/तलाठी/ सरपंच यांच्या स्वाक्षरी व गोल रबरी शिक्क्यासह ना उत्पन्न प्रमाणपत्र (PENURY CERTIFICATE).

पूर्व मंजूर पेन्युरी ग्रँट माजी सैनिक/माजी सैनिक विधवांनी प्रत्येक वर्षाच्या डिसेंबर महिन्यामध्ये हयातीचा दाखला जिल्हा सैनिक कार्यालय रायगड-अलिबाग यांच्याकडून प्राप्त करुन घ्यावा व ऑनलाईन अपलोड करावा. वेळेत हयातीचा दाखला अपलोड न केल्यास त्या वर्षाची आर्थिक मदत मिळणार नाही, याची नोंद घ्यावी.

 आर्थिक वर्ष  2020-2021 चे  माजी सैनिक/ माजी सैनिक विधवांचे या कार्यालयात आजतागायत  प्राप्त झालेले हयातीचे दाखले जिल्हा सैनिक कार्यालयाने केंद्रीय सैनिक बोर्ड यांच्याकडे अपलोड केले आहेत. संबंधितांनी आपल्या लॉगईन-आयडी च्या सहाय्याने याबाबत खात्री करुन घ्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी दूरध्वनी क्र. 02141-222208 वर संपर्क साधावा, तसेच ही आर्थिक मदत ही तहहयात असल्याने, जिल्हयातील पात्र लाभार्थ्यांनी  या  संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.