मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरण आज मोठे वळण घेऊ शकते. कारण मृत सुशांतचा नोकर दीपेश सावंतला नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी)ने काल ताब्यात घेतले होते, रात्रभर त्याला बोलते केल्यानंतर एनसीबीकडे त्याने मोठी कबुली दिल्याचे वृत्त आहे. रियाच्या इशार्यावर घरी ड्रग्ज मागवले जात होते, अशी रियाच्या विरोधातील कबुली दीपेशने दिली आहे. त्यामुळे आज एनसीबीची टीम कोणत्याही क्षणी रियाच्या घरी धडकू शकते.
चौकशीत सॅम्युअल मिरांडाने सुद्धा रियाच्या ड्रग्ज कनेक्शनची माहिती दिली आहे. शौविकने सुद्धा रियाची रहस्य उघड केली आहेत. त्यापाठोपाठ आज सुशांतचा नोकर दीपेशने रिया घरी ड्रग्ज मागवत असल्याची कबुली दिल्याने एनसीबीची टीम आज रियाच्या घरी कधीही धडकू शकते.
मिरांडा, शौविक, व अन्य लोकांसोबत झालेल्या व्हॉट्सअप चॅटबाबत एनसीबी रियाकडे चौकशी करू शकते. रिया चक्रवर्तीला या प्रकरणात अटकसुद्धा होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण, रियाच्या भावाला अटक झाल्यानंतर रियाला अटक होण्याची शक्यता आणखी दाट झाली आहे. शिवाय अटक झालेल्या सातही जणांनी जबाबात रियाचा उल्लेख केला आहे. एनसीबीने रियाचा भाऊ शौविकसह 7 अन्य लोकांना अटक सुद्धा केली आहे.