कोलाड (श्याम लोखंडे ) : निवडणुका येतील जातील परंतु शासनाने घालून दिलेल्या नियम अटी शर्ती तसेच कायदा सुव्यस्थेचे पालन करणे आवश्यक आहे. त्याच बरोबर ग्राम पंचायत निवडणूक कालावधीत आचारसंहितेचा कोणीही भंग करू नये केल्यास त्यावर कठोर कारवाही केली जाईल मतदान करण्याचे दिवस जस जसे जवळजवळ येतील तस तसे विविध वारे वाहत जातील त्यामुळे जेणे करून आपापसात वाद निर्माण होईल असे कोणीही वागू नका निवडणुकीत कोणीही निवडून येवो परंतु आपल्या गावचा विकास झाला पाहिजे हा हेतु प्रत्यकाने मनात ठेवा कायदा सुव्यस्थेचे पालन करा त्याचे उल्लंघन करू केल्यास कठोर कारवाई केली जाईल असे प्रतिपादन कोलाड पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस अनिल घायवत यांनी तळवली तर्फे अष्टमी ग्राम पंचायत निवडणूक संदर्भात तळवली येथे केले.
येत्या 18 डिसेंबर रोजी रोहा तालुक्यातील पाच ग्राम पंचायतीचा कार्यकाळ संपला असल्याने त्या ठिकाणी पुन्हा थेट सरपंच पदाच्या तसेच सदस्य पदासाठी निवडणुका होत आहेत. त्यात कोलाड विभागातील पहुर, पुई, तळवली तर्फे अष्टमी या ग्राम पंचायतींचा समावेश असल्याने या संदर्भात कायदा आणि सुव्यवस्था यांचे पालन तळवली तर्फे अष्टमी ग्राम पंचायत येथील निवडणूक लढवत असलेले उमेदवार यांना बाबतच्या सूचना देण्यासाठी तसेच ग्रामस्थ नागरिक यांना माहिती देण्यासाठी कोलाड विभागीय पोलीस निरीक्षक साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस अनिल घायवत यांनी भेटी दरम्यात दिली. यावेळी पोलीस तडवी ,पोलीस पाटील गणेश महाडिक,खेळू मरवडे,तसेच निवडणूक लढवत असलेले उमेदवार आणि तळवली व चिल्हे ग्रामस्थ बहुसंख्येने उओसाठी होते .
तसेच ते पुढे म्हणाले की व्यक्ती हरला तरी चालेल परंतु गाव हरता कामा नये निवडणूक काळात बॅनर लावणे तसेच साउंड सिस्टम वापरणे याला अधिकृत परवानगी घेणे आवश्यक आहे. त्याच बरोबर कोणालाही विरोधात घोषणाबाजी करतांना जेणेकरून दोन्ही गटात पेच अथवा तंटा निर्माण होईल असे कोणी करू नये तसे तक्राल असल्यास संबधित उमेदवार यांच्यावर कारवाई केली जाईल निवडणूक हा दोन दिवसांचा खेळ आहे. परंतु तो कसा खेळावा हे प्रत्येक माणसाच्या हातात आहे. परंतु यासाठी कायदा आणि सुवस्थेचा पालन करा असे मौलिक मार्गदर्शन सहा. कोलाड पोलीस अनिल घायवत यांनी केले.