नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचे रूग्ण वाढत चालल्याचे दिसत आहे. बुधवारी सकाळी 8 वाजतापासून गुरूवारी सकाळी 8 वाजेपर्यंत कोरोना व्हायरसची विक्रमी 83883 नवी प्रकरणे समोर आली. आता देशात एकुण कोरोना व्हायरस प्रकरणांचा आकडा 38,53,406 झाला आहे. देशभरात एका दिवसात कोरोना व्हायरसची एवढी प्रकरणे कधीही आली नव्हती.
24 तासादरम्यान देशात कोरोनामुळे 1043 लोकांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत झालेल्या मृत्यूंची संख्या वाढून 67376 झाली आहे. देशात कोरोना व्हायरसचा मृत्यूदर 1.74 टक्के झाला आहे.
इतर आकडेवारी
– 24 तासात 68584 रूग्ण बरे झाले.
– आतापर्यंत 2970492 लोक बरे झाले.
– अॅक्टिव्ह रूग्ण सुमारे 8.15 लाख आहेत.
– रिकव्हरी रेट देशात 77.08 टक्के आहे.
– बुधवारी देशभरात विक्रमी 11.72 लाखपेक्षा जास्त कोरोना टेस्ट.
– आतापर्यंत एकुण 4.55 कोटींपेक्षा जास्त टेस्ट झाल्या.