‘रक्षाबंधनावर’ कोरोनाचे सावट

पेण : कोरोनाच्या दहशतीने माणुस  हरवून बसला असून नात्यांचे बंधही सैल झालेत. स्वतःचे जीवाचे रक्षण करणे हेच प्रत्येकाचे ध्येय बनले आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने राखी बांधण्यासाठी गावात येऊ नये.भावाला प्रतिकात्मकरित्या राखी बांधून हा सण साजरा करावा असे आवाहन करण्यात येत असल्याने रक्षाबंधन सणावर मर्यादा पडणार आहेत.

भारतीय  जीवनशैलीत सण-उत्सव, यात्रा यांचे विशेष महत्व असते. कोरोनाच्या संकटामुळे चार महिने मंदिरे, प्रार्थनास्थळे बंद आहेत. कोरोनारुपी भस्मासुरा पासून रक्षण करण्याला प्राधान्य दिले आहे.  काही दिवसांनी येणाऱ्या कृष्ण जन्माष्टमी आणि त्यानंतर येणाऱ्या गणेशोत्सवाच्या उत्साहावर मर्यादा पडणार असल्याने कोरोनाचे भूत मानगुटीवर कधी उतरतोय याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे

भावाच्या हाताला राखी बांधून बहिण भावाचे हृदय जिंकून घेते तर  भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी घेत असतो. जगातील सर्वात  पवित्र नाते हे भावा-बहिणीचे नाते मानले जाते .परंतु कोरोनाच्या संकटामूळे बहिण भावाच्या हाताला राखी बांधायला जाणार नाही. पुराण काळापासून चालत आलेल्या रक्षाबंधनाला  मर्यादा येत सल्याचे पहिल्यांदाच घडत आहे.

सण-उत्सव यापुढे येतच राहतील.आताची वेळ घरात शांत बसण्याची आहे. स्वतःच्या भावनांना थांबवा.आपल्या हट्टामुळे आपल्या परिवारातील कोणत्याही सदस्यांना कोणत्या प्रकारचा गोष्टीला सामोरे जावे लागेल असं पाऊल उचलू नका, प्रतित्माक राखी बांधून सण साजरा करावा .