पनवेल (संजय कदम) : ककोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढायला सुरुवात केली आहे . इंडियन मेडिकल असोसिएशनने नुकतेच हा आजार भारतात वाढण्याची शक्यता दर्शवलेली असून लोकांना प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे एका पत्रकाद्वारे जाहीर केलेले आहे. यापार्श्ववभूमीवर बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची आज भेट घेतली.
यावेळी बाळासाहेबांची शिवसेना मार्फत बूस्टर डोस लसीकरण मोहीम पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. त्यानुसार आयुक्त गणेश देशमुख यांनी, सर्वांना आश्वाशीत केले की, लवकरच प्रत्येक आरोग्य केंद्रात, लसीकरण येत्या तीन ते चार दिवसात सुरु करण्याची ग्वाही दिली.
यावेळी महानगर संघटक मंगेश रानवडे, खारघर शहर संघटक इम्तिज शेख, विभाग प्रमुख मुनाफ आमिरली, विभाग प्रमुख झोहेब शेख आदी उपस्थित होते.