नवी दिल्ली : 24 ते 26 डिसेंबर या तीन दिवसांत आंतरराष्ट्रीय विमानांतून भारतात परतलेले 39 प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
देशातल्या सर्व विमानतळांवर 24 डिसेंबरपासूनच विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची टेस्ट केली जात आहे. एकूण 498 विमानांतून परतलेल्या 3 हजार 994 लोकांची टेस्ट करण्यात आली. ज्यात 39 प्रवाशी पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्वांचे नमुने जीमोन सीक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.
27 डिसेंबर रोजी देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 157 नवीन रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात संसर्गाची 3421 सक्रिय रुग्णसंख्या आहे. मागील दिवसाच्या तुलनेत केसेस कमी आहेत. 26 डिसेंबर रोजी 196 नवीन प्रकरणांची नोंद झाली.
Related