कोरोना ने गाठला हजारचा टप्पा; महाड मध्ये कोरोनाचा प्रकोप वाढला, ४९ जनांना लागण, ५ झाले बरे

महाड (रवि शिदें) : महाड तालुक्यात कोरोनाने हजारी गाठली असुन पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप वाढला आहे. महाड मध्ये काल  ४९ जनांना कोरोनाची लागण झाली आहे, तर पाच जनांनी कोरोनावर मात केली आहे. एकाचा मृत्यू झाला आहे. महाड तालुक्यात कोरोनाची संख्या आता झपाट्याने वाढू लागली आहे.कोरोनाने हजारचा टप्पा गाठला असुन हा दर असाच राहीला तर येत्या डिसेंबर पर्यंत कोरोना महाडच्या प्रत्येक घरात पोहचलेला असेल.

महाड तालुक्यात काल कोरोनाचे ४९ रुग्ण आढळून आले आहेत, यामध्ये बिरवाडी ४८ पुरुष, आकाशगंगा चवदगरतळे महाड २४ स्त्री व ३३ पुरुष, वडवली ८० पुरुष, मिदास रेसि. प्रभातकाॅलनी महाड १८, ४३ पुरुष, बारसगाव ४९ पुरुष, चोचिंदे ५८, ५५ पुरुष, सुदर्शन काॅलनी ५० पुरुष, लक्ष्मीनगर बिरवाडी ४२ स्त्री, भिमनगर ६५ पुरुष, पार्यवाडी २५ स्त्री, बिरवाडी ४५ पुरुष, नांगलवाडी २८ पुरुष व ५४ स्त्री, खरवली ५० पुरुष, देशमुख मोहल्ला महाड ६३ पुरुष, नाते २६ पुरुष, पिंपळदेवी भावे २५ पुरुष, मांघरुन २७ पुरुष, महाजन काॅम्ल्पेक्स नांगलवाडी ४४ पुरुष, पिडीलाइट काॅलनी ४९, ४० पुरुष, ३४ स्त्री, हेरंबपार्क दस्तुरीनाका महाड ३८ पुरुष, चांभारखिंड ३३ पुरुष, तांबट‌आळी महाड ७५ स्त्री, लक्ष्मी आर्केड दस्तुरीनाका महाड ४२ स्त्री, तालुकापोलीस ठाणे महाड ३२ पुरुष व ३० स्त्री, सुतार कोंड चिंभावे २५, ३२ पुरुष ४ स्त्री, अप्पर तुडील ४६, ८५ पुरुष, लोअर तुडील ६ पुरुष व १० स्त्री, दत्तवाडी चिंभावे ४५, ६० पुरुष, किंजळघर ६५ स्त्री, विन्हेरे ५८ पुरुष, उंदेरी ४४ स्त्री, कोथेरी ६१ पुरुष, महादेव काॅम्प्लेक्स एमजी रोड महाड ५९ पुरुष, शिंपीआळी महाड ६५ पुरुष, गोठे ६६ पुरुष, विराट रेसि.नवेनगर महाड २७ पुरुष, साईनाथ सर्व्ही.दस्तुरीनाका महाड ३७ पुरुष यांचा समावेश आहे. काल पाच जनांनी कोरोनावर मात केली आहे तर गोठे येथील ६६ पुरुषांचा मृत्यू झाला आहे.

महाड मध्ये १५८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ८३३ जनांनी कोरोनावर मात केली आहे तर ४६ जनांचा मृत्यू झाला आहे. अजुन पर्यंत महाड तालुक्यात १०३७ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे