कोरोना: मुंबईतील रूग्ण दुप्पटीचा वेग ६७ दिवसावर

राज्यात सर्वाधिक रूग्णसंख्येच्याबाधीत सर्वात अधिक असलेल्या मुंबई शहरातील कोरोना रूग्णवाढीचा दर आता १ टक्क्यावर आला आहे. तर रूग्ण दुपटीचा वेग ६७ दिवसांवर पोहोचला आहे. त्यामु‌ळे शहरात कोरोना विषाणूवर चांगल्यापैकी नियंत्रण मिळविण्यात मुंबई महापालिकेला यश मिळाल्याचे दिसून येत असून मागील २४ तासात १११५ रूग्ण आढळून आले आहेत. तर ५७ जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली.</p><p>याशिवाय राज्यात ९४३१ नव्या बाधित रूग्णांचे निदान झाले असून राज्यातील एकूण बाधित रूग्णांची संख्या ३ लाख ७५ हजार ७९९ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ४८ हजार ६०१ वर पोहोचली आहे. तसेच मागील २४ तासात ६०४४ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या २ लाख १३ हजार २३८ वर पोहोचली आहे. तर २६७ जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.</p><p>ठाणे जिल्हा, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईसह महानगरातील नव्या बाधित रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate<strong>) </strong> <strong>५६.७४  एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर ३.६३ % एवढा आहे