कोलाड, खांब, पुगांव, नडवली, चिल्हे, धानकान्हे, देवकान्हे, पिंपळवाडीत दत्त जयंती उत्सव सोहळा

datt
कोलाड (श्याम लोखंडे) : रोहा तालुक्यातील कोलाड़ खांब पुगांव,नडवली चिल्हे,देवकान्हे (पिंपळवाडी) या विभागात ठीक ठिकाणी सालाहबाद प्रमाणे धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीने बुधवारी 7 डिसेंबर रोजी दत्त जयंती निमित्ताने दत्त जयंती जन्मोंउत्सव विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांनी संपन्न होत आहे.
सदरच्या कार्यक्रमात श्री गुरुदेव दत्तात्रेय जन्मउत्सव श्री दत्त पूजा पाद्य पूजन महाभिषक तद् नंतर श्री सत्यनारायणाची महापूजा तसेच विविध ठीक ठिकाणी सांयकाळी 6 ते 7 या वेळेत हरिपाठ तसेच विविध धार्मिक कार्यक्रम साजरे केले जाणार असून देवकान्हे पिंपलवाड़ी येथ वारकरी संप्रदायाचे मार्गदर्शक रायगड भूषण पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा तालुका कोकणदिंडी वारकरी संप्रदाय हरिपाठ तद्नंतर महाप्रसाद व रात्रौ 9 ते 11 या वेळेत ह भ प दिनेश महाराज कडव (वांदोली) रोहा यांचे सुश्राव्य कीर्तन रुपी सेवा या कार्यक्रमाच्या निमित्ताने होणार आहे,
तसेच रात्रौ देवकान्हे,पिंपलवाड़ी ग्रामस्थ व महिला मंडळ यांचा भजन जागर होणार आहे तसेच कोलाड़ खांब पुगांव नडवली चिल्हे धानकान्हे या ठिकाणी देखील मोठ्या उत्साह वातावरणात भजन कीर्तन जागर होणार आहे व विविध विधिवत पद्धतीने दत्तपुजा पूजा तसेच धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
सदर या कार्यक्रमाची व श्री दत्त जयंती उत्सवाची जय्यत तयारी कोलाड ,पुगाव,खांब,नडवली,तळवली,चिल्हे,धानकान्हे, देवकान्हे पिंपळवाडी सह ग्रामस्थ महिला मंडळ व युवक युवती अतिशय परिश्रम घेत आहेत तरी सर्व भाविक भक्त गणांनी याचा लाभ घेवा असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात येत आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *