कोलाड नाक्यावरील मुख्य चौकातील रस्त्याची गंभीर अवस्था; वाहनचालकांसह प्रवाशी वर्गाच्या जिवाला धोका ! कोलाड करांचा सुखकर प्रवास कधी होणार?

goa-road
कोलाड (श्याम लोखंडे) : मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील कोकणचा केंद्रस्थानी असलेल्या कोलाड आंबेवाडी नाक्यावरील मुख्य रहदारीच्या ठिकाणी असलेल्या रस्त्याची गंभीर अवस्था झाल्याने येथील वाहनचालकांसह प्रवाशी वर्ग यांच्या जिवाला धोका निर्माण झाला कोलाड परिसरातील नागरिकांचा सुखकर प्रवास कधी होणार यावर आता प्रश्न चिन्ह निर्माण झाले असून संबंधितांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रवाशी वर्गातून बोलले जात आहे.

गतवर्षी प्रचंड पडलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी रस्ते पूर्णतः उखडले गेले आहेत त्यातच कोलाड कडून रोहा कडे जाणारा मुख्य असलेले स्व. द. ग. तटकरे आंबेवाडी चौक नाका समजला जाणारा रस्ता अनेकदा दुरुस्ती नंतर देखील उखडला गेला आहे. येथील कोलाड नाक्यावरील असणारी प्रचंड रहदारीने हा रस्ता अधिकच उखडला गेल्याने येथे पडलेल्या खड्ड्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे व खबरदारी घ्यावी लागत असून वाहने हळू चालवावी लागत असून यामुळे वाहतूक कोंडीही अधिक निर्माण होत आहे.

गेली बारा वर्षाहून अधिक काळ या महामार्गाच्या पलस्पे ते इंदापूर दरम्यानच्या पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरनाचे काम सुरू आहे देशातील अनेक महामार्ग तयार करण्यात केंद्र सरकार यशस्वी झाले आहे परंतु मुबंई कडून कोकणात जाणाऱ्या मार्गाची ही रखडपट्टी आजही कायम आहे अनेक प्रवाश्यांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे मात्र यावर कोणी काही बोलत नाही बजेटावर बजेट तयार करण्यात आले कोट्यावधी रुपये खर्च झाले मात्र आजही समाधानकारक या मार्गाचे काम बेभरवशाचे दिसून येत आहे याचे काम जलद गतीने व भले मोठे पडलेल्या खड्यांची दुरुस्ती करावी यासाठी रायगडच्या पत्रकारांनी आंबेवाडी कोलाड नाका येथे 9 नोव्हेंबर रोजी साखळी आंदोलन केले त्यात संबधित अधिकारी वर्गाने सदरच्या कामाबाबत आश्वासन दिले तरी देखील खड्यांची दुरुस्ती होत नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे राज्याच्या सत्ता संघर्ष नाट्यात महामार्गाचे काम अधिक गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे प्रवास करणाऱ्या प्रवाशी वर्गाची चिंता अधिक वाढली असल्याने त्यांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या कोलाड नाक्याच्या आजूबाजूला ६० ते ६५ गावे वाडया, वस्त्या असल्यामुळे बाजारासाठी असंख्य नागरिक ये जा करीत असतात तसेच या परिसरात शाळा, कॉलेज पॉलिटेक्निकल कॉलेज असल्यामुळे असंख्य विद्यार्थी प्रवास करीत असतात यामुळे येथे नागरिकांची सतत वर्दल दिसून येते तर धाटाव एम आय डी सी, रोहा,अलिबाग, मुरुडकडे जाणारी येणारी वाहने याची वाहतूक मोठया प्रमाणावर होत असते यामुळे वाहन चालकांसह,प्रवाशी,तसेच पादचारी नागरिक यांना येथून येजा करतांना आपला जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून याकडे सार्वजनिक बांधकाम खाते तसेच संबंधितांनी त्वरित लक्ष देऊन या मुख्य चौकातील उखडलेल्या रस्त्याचे काम जलद गतीने करावे अशी मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *