कोलाड परिसरातील बत्ती गूल, ४० ते ४५ गावं अंधारात, नागरिकांकडून तीव्र संताप

mseb
कोलाड (श्याम लोखंडे ) : रोहा तालुक्यातील कोलाड खांब परिसरातील ४० ते ४५ गावातील मंगळवार दि ३ जानेवारी २०२३ रोजी मध्यरात्री पासून बत्ती गूळ झाली असून येथील नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागल्यामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

या परिसरातील जनतेला वाटले कि अदानी इलेक्ट्रिकल कंपनीस वितरणाचा परवाना देऊ नये विज कंपनीचे खाजगीकरणाचे धोरण रद्द करावे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना कायम करावे. तिन्ही कंपन्यातील ४२००० रिक्त भरण्यासाठी प्रक्रिया तात्काळ सुरु करावी यासाठी महावितरण ७२ तास शटडाऊन केला आहे, असे वाटले परंतु इतर परिसरातील विज पूर्णपणे सुरु असल्याचे नागरिकांच्या लक्ष्यात आल्यावर या परिसरातील जनता आक्रमक झाली.

याविषयी कोलाड महावितरण कार्यालयात राजकीय,सामाजिक व विविध क्षेत्रातील जेनतेने उपस्थित राहून चौकशी केली असता कांदळ गावावरून येणारी लाईन काही तांत्रिक बिघाडामुळे खराब झाल्यामुळे या परिसरातील विज बंद झाल्याचे महावितरण कंपनीकडून सांगण्यात आले.त्यामुळे आम्हांला अडचणीत जनतेने सहकार्य करावे.विज दुरुस्तीचे काम सुरु असून ते लवकरच पुर्ण केले जाईल व विज सुरु करण्यात येईल असे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *