“कोविशील्ड” लसीकरण मोहिमेचा आ. रविशेठ पाटील हस्ते शुभारंभ

santosh1

पेण (संतोष पाटील ) : केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे पेण शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे “कोविशील्ड” लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आ. रविशेठ पाटील व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी आ. रविशेठ पाटील, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, पेण नगराध्यक्ष प्रीतम पाटील, उपविभागीय पोलीस अधीक्षक विभा चव्हाण, तहसीलदार अरुणा जाधव, नायब तहसिलदार सुनील जाधव, डॉ. राजीव ताम्हाणे, डॉ वंदनकुमार पाटील, डॉ. नेत्रा पाटील, सूरज म्हात्रे, शुभांगी म्हात्रे, गीता भरून, अनिता भोपी, कोमल धोत्रे, वर्षा गवळी, स्वेता म्हात्रे , विद्या आंबेकर, विना भोपु आदिंसह उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
प्रारंभी “कोविशील्ड” लसीकरण केंद्राचे आ. रविशेठ पाटील यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत फित कापून व विना भोपु यांना लस टोचण्यात येवून कोविशील्ड लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली.

जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात अलिबाग जिल्हा रुग्णालयात 1, उपजिल्हा रुग्णालय पेण येथे 1 आणि पनवेल येथील 2 अशा 4 केंद्राच्या माध्यमातून आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविशील्ड लस दिली जाणार असल्याची माहिती डॉ. राजीव ताम्हाणे यांनी दिली. पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसानंतर त्याच व्यक्तीला दुसरा डोस देण्यात येणार आहे. यासाठी सिरम इन्स्टिटयूटने तयार केलेली कोव्हीशिल्ड लस तसेच भारत बायोटेक या उत्पादकाने तयार केलेली कोव्हॅक्सीन लस देण्यात येणार आहे. या दोन्ही लसी सुरक्षित असल्याचे केंद्र शासनाने कळविले आहे. भारत बायोटेक कडून प्राप्त झालेली कोव्हॅक्सिन लस ही राज्यातील 6 ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यामध्ये 4 वैद्यकीय महाविद्यालये व 2 जिल्हा रुग्णालयांचा समावेश आहे. पेण उपजिल्हा रुग्णालयात 400 डोसचा पुरवठा झाला असून 200 लाभार्थींना तो देण्यात येईल.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रथम प्राधान्याने आरोग्य कर्मचा-यांना लस देण्यात येणार आहे. त्यानुसार नोंदणी झालेल्या सर्व शासकीय व खाजगी डॉक्टर्स, नर्सेस व इतर आरोग्य कर्मचा-यांना लस देण्यात येणार आहे. या लसीचे 2 डोस 4 आठवड्यांच्या अंतराने देण्यात येणार आहेत,प्रत्येक लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी शीतसाखळी अबाधित ठेवून लस, लसीकरणा साठी आवश्यक सामुग्री, AD Syringes तसेच AEFI Kit उपलब्ध आहेत. तसेच सर्व संबंधीत कर्मचाऱ्याना आवश्यक प्रशिक्षणही देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.