अलिबाग : पेझारी येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या लक्ष्मी शालिनी महिला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार निवासी शिबिर “युवकांचा ध्यास : ग्राम शहर विकास” या उदघोषणे अंतर्गत तीनविरा येथे दिनांक 18 डिसेंबर ते 24 डिसेंबर 2022 या कालावधीत संपन्न झाले.
या शिबिराचे उद्घाटन दिनांक 18 रोजी 18 डिसेंबर जिल्हा परिषद सदस्या आणि झेप फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर चित्राताई पाटील यांच्या शुभहस्ते आणि राष्ट्रीय सेवा योजना, जिल्हा समन्वयक प्राध्यापक तुलसीदास मोकल यांच्या विशेष उपस्थितीत झाले. याप्रसंगी बोलताना डॉक्टर चित्राताई पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशी शिबिरे आवश्यक असतात असे प्रतिपादन केले तर प्रमुख पाहुणे प्राध्यापक तुळशीदास मोकल यांनी एनएसएस हे व्यक्तिमत्त्व विकासाचे साधन असल्याचे सांगितले दिनांक 19 डिसेंबर रोजी तीनविरा आदिवासी वाडीत स्वच्छता अभियान हा उपक्रम राबवण्यात आला दुपार सत्रा मध्ये जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी महाविद्यालयीन जीवनात राष्ट्रीय सेवा योजना आणि इतर उपक्रमांचे महत्त्व या विषयावर महत्त्वपूर्ण व्याख्यान दिले महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर भटू वाघ यांनी गटचर्चा माध्यमातून शिबिरार्थी विद्यार्थिनीना व्यक्तिमत्व विकास कसा घडवता येऊ शकतो याचे प्रात्यक्षिक सादर केले.
दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी तीनविरा धरण परसर स्वच्छ करून अलिबाग पेण हायवे लगत पडलेल्या प्लॅस्टिक कचरा निर्मूलन करण्यात आले ,या दिवशी शिबिर अंतर्गत एन एस एस च्या माजी विद्यार्थिनींचा मेळावा आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी जिविता पाटील, पूनम पाटील ,मनीषा चव्हाण कांचन मोहिरे आणि प्राध्यापक अस्मिता पाटील या माजी विद्यार्थिनींनी शिबिरार्थी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले आणि राष्ट्रीय सेवा योजना आपल्या जीवनात किती महत्त्वपूर्ण भूमिका बजावते हे स्पष्ट केले हा मेळाव्यात डॉक्टर संगीता चित्रकोटी यांचेही मार्गदर्शन लाभले त्यांनी आपल्या मनोगतामध्ये असे प्रतिपादन केले की ,महाविद्यालय आपल्याला घडवण्याचं काम करते परंतु महाविद्यालयाला विसरू नका असे सांगितले दुपार सत्रामध्ये ऑडव्होकेट गीता दर्शन म्हात्रे यांनी महिला विषयी कायदे व सायबर सुरक्षा याविषयी व्याख्यानात विद्यार्थ्यांना कायदेशीर बाजू पटवून सांगितले त्याचबरोबर प्राध्यापक संदीप घाडगे यांनी संविधानिक मूल्य या विषयावर विशेष व्याख्यान दिले.
दिनांक 21 डिसेंबर रोजी तिनविरा गाव परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात आले,विद्यार्थ्यांनी तीनविरा येथील वनविभागाचा कार्यालयाला आणि तेथील रोपवाटिकेला भेट दिली याप्रसंगी तिनवीरा वनविभागाचे वन अधिकारी सदाशिवराव मंटूर यांनी वन्य व्यवस्थापन आणि वन विभागातील नोकरीच्या संधी या विषयावर विशेष व्याख्यान दिले याप्रसंगी महाविद्यालयातल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविकांनी वन निरीक्षण करून वनविभागाच्या कार्याचा प्रत्यक्षात आढावा घेतला.
यावेळी प्राध्यापक संतोष बिरारे यांनी पर्यावरण संवर्धन कार्यशाळा देखील घेतली दुपारच्या सत्रात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती रायगड शाखेच्या वतीने उपाध्यक्षा निर्मला फुलगावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर विविध प्रात्यक्षिके सादर करून अंधश्रद्धा आजच्या युगातही कशी घातक ठरते आहे हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले, बुवाबाजी ढोंगी वाघ लोकांपासून आपण सावध राहिले पाहिजे असे प्रतिपादन केले याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा अलिबागचे कार्यकर्ते नितीन राऊत, श्रीमती जोगळेकर मॅडम, मिठागरे, दिपाली मॅडम हेउपस्थित होते.
दिनांक 22 डिसेंबर रोजी रस्त्याच्या दुतर्फा असलेला प्लॅस्टिक कचरा गोळा करून योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावली, सकाळ सत्रात नागोठणातील कराटे प्रशिक्षक कल्पेश शिंदे यांनी कराटे प्रशिक्षण व महिला सबलीकरण याविषयी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले विद्यार्थिनींनी कराटे प्रशिक्षणाचा लाभ घेतला दुपार सत्रात दैनिक कृषीवल चे संपादक राजेंद्र साठे यांनी माध्यमे आणि युवक याविषयावर महत्वपूर्ण व्याख्यान दिले सायंकाळच्या सत्रात प्रा.दिलीप सोनवणे आणि प्रा.अनिल बांगर यांच्या नेतृत्वाखाली भाषिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
यामुळे शिबिरातील विद्यार्थिनींना भाषेचा व्यावहारिक वापर कौशल्याचा लाभ मिळाला दिनांक 23डिसेंबर रोजी पुनर्वसित गाव गणेशपट्टी येथे सार्वजनिक स्वच्छता अभियान घेण्यात आले तसेच तीनविरा नाक्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र पोयनाड मार्फत मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार हा उपक्रम राबवण्यात आला या प्रसंगी सुमारे 80 रुग्णांनी या उपक्रमाचा लाभ घेतला दुपार सत्रात आगरी सामाजिक संस्था अलिबाग चे अध्यक्ष, प्रसिद्ध साहित्यिक कैलास पिंगळे यांचे साहित्य व समाजभान या विषयावर विशेष व्याख्यान झाले या प्रसंगी त्यांनी नारायण नागू पाटील यांनी केलेली सामजिक सेवा व चरीचा शेतकरी संप यांचा आढावा घेऊन स्वर्गीय दत्ता पाटील आणि प्रभाकर पाटील यांनी केलेली कामगिरी आपण विसरता कामा नये असे विद्यार्थिनींना सांगितले,दुपार सत्रातील दुसरे व्याख्याते प्राचार्य कमलाकर फडतरे यांनी स्पर्धा परीक्षा याविषयावर मार्गदर्शन करून या क्षेत्रात विविध संधीचा फायदा घेण्याचे आवाहन केले.
सायंकाळी महाड येथील प्रांत अधिकारी, तहसीलदार आणि पोलादपूर तहसीलदार यांनी अनौपचारिकरीत्या शिबिरास भेट देऊन शिबिरातील विद्यार्थिनीना शुभेच्छा दिल्या या शिबिराचा समारोप दिंनाक 24 डिसेंबर रोजी पंडित शेठ फाउंडेशन चे अध्यक्ष सुप्रभात सुभाष पाटील तथा युवकांचे नेते सवाई शेट पाटील यांच्या विशेष उपस्थितीत झाला याप्रसंगी बोलतांना त्यांनी ,तरुणांनी कोणत्याही प्रसंगात न डगमगता चिकाटीने ध्येय साध्य केले पाहिजे त्यासाठी मदतीस महाविद्यालय व व्यवस्थापन आहेच फक्त लाभ घेता आला पाहिजे असे प्रतिपादन केले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रोहा येथील चिंतामणराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अतुल साळुंखे उपस्थित होते त्यांनी आपल्या व्याख्यानात विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना शिबिराची उपयुक्तता आणि विद्यार्थी विकास यांचा निकटचा संबंध यांचा आपल्या ओघवत्या शैलीत आढावा घेतला.याप्रसंगी शिबिरार्थी विद्यार्थिनी सुहानी पाटील,प्रतीक्षा पाटील,दिशा पाटील,भूमिका वाटमारे,सृष्टी म्हात्रे,जान्हवी पाटील आणि एन एस एस कॅम्प लीडर निशीता झेले यांनी मनोगते व्यक्त केली.
शिबिर प्रमुख आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.महेश बिऱ्हाडे यांनी शिबिराचा आढावा घेतला.या शिबिरासाठी कोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय दादा पाटील,सर्व संचालक मंडळ,मुंबई विद्यापीठ एन एस एस विभाग,माजी आमदार पंडित शेट पाटील, कोएसो चे कार्यवाह ऍडव्होकेट सिध्दार्थ पाटील ,जिल्हा परिषद सदस्या भावना ताई पाटील, कोएसोचे मुख्यकार्यकारी अधिकारी विनायक खोपकर,सहाय्यक मुख्यकार्यकारी अधिकारी अशोक गावडे,प्रशासनाधिकारी प्रा.सुरेंद्र दातार सर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले शिबिरात योग प्रशिक्षणासाठी पतंजली योगपीठ आणि भारत स्वाभिमान ट्रस्ट हरिद्वार चे रायगड प्रभारी दिलीप गाटे ,भरत कहाणे,गौतम लेऊआ यांचे सहकार्य लाभले तर तीनविरा येथील सरपंच,पोलीस पाटील,महिला मंडळ,गेस्ट हाऊसचे सर्व कर्मचारी,जिल्हापरिषद पाणीपुरवठा विभाग,माजी सरपंच सौ.प्रीती पाटील आणि महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी,समीर पाटील,सारिका म्हात्रे,जयवंत वालेकर,ज्योत्स्ना पाटील,शोभा टेमकर ,निलेश कुलाबकर आदींचे सहकार्य प्राप्त झाले.