पेण (राजेश प्रधान) : पेण तालुक्यातील खरोशी गावचे माजी सरपंच रामदास दामोदर पाटील यांचं ०३ डिसेंबर रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी हृदयविकाच्या तीव्र झटक्याने निधन झालं.
त्यांच्या पश्चात मुले, सून ,मुली, जावई, भाऊ, भावजया, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रामदास पाटील हे १० वर्ष खरोशी-दूरशेत ग्रामपंचायत बिनविरोध सरपंच होते, तसेच खरोशी जिल्हा परिषद शाळेचे चेअरमन, गाव पंच व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्या कालावधीत खरोशी गावाला तंटामुक्तीचा पारितोषिक मिळाले होते. संपूर्ण पंचक्रोशीत बापू या नावाने प्रसिद्ध होते.
यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ होता. त्यांच्या जाण्याने खरोशी गावाची न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या अंत्ययात्रेत पेण चे आमदार रविंद्र पाटील यांच्यासह शेकडो पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
त्यांचा दशविधी कार्यक्रम श्रीक्षेत्र उद्धर येथे तर तेरावे १५/१२/२०२२ राहत्या घरी खरोशी येथे होणार आहे. या दहा दिवसांमध्ये दररोज सायंकाळी ६ ते ७ भजन रुपी सेवा तसेच तेराव्याला ह. भ. प. श्री अमित म्हात्रे यांचे सकाळी १० ते १२ किर्तन रुपी सेवा होणार आहे.