खांब ग्रा.पं.सरपंचपदी रंजना टवळे यांची तर उपसरपंचपदी मनोज शिर्के विराजमान

shyam29
कोलाड (श्याम लोखंडे ) : रोहा तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ग्रा.पं.निवडणुकीत बहुमताने सत्ता प्रस्थापित केलेल्या ग्रु.ग्रा.पंचायत खांब ग्रा.पंचायतीच्या आज झालेल्या सरपंच व उपसरपंच पदाचे निवडणुकीत सरपंचपदी रंजना योगेश टवळे यांची तर उपसरपंचपदी मनोज अनंत शिर्के यांची निवड करण्यात आली आहे.
कोकणचे भाग्यविधाते तथा रायगडचे खा.सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून या ग्रा.पंचायतीचे विकासकामांसाठी नेहमीच झुकते माप मिळाल्याने व मोठ्या प्रमाणावर विकासकामे मार्गी लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच आपल्या ग्रा.पंचायतीचा विकास करू शकतो हा सुज्ञ मतदारांचा ठाम विश्वास असल्याने मतदारांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुनश्च सत्तेची संधी दिल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने या ग्रा.पंचायतीवर आपले निर्विवादपणे वर्चस्व प्रस्थापित करून येथील नऊ पैकी नऊ सदस्य बहुसंख्ये मताधिक्याने निवडून आणले .
आज 10 फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या सरपंचपदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण असल्याने सरपंच पदासाठी इच्छूक सदस्यांची संख्याही मोठी असल्याने पहिल्या सरपंच पदाचा बहुमान कोणाला मिळतोय याकडे सा-यांचेच लक्ष लागले असतानाच पक्षश्रेष्ठींनी योग्य निर्णय घेऊन पहिला सरपंचपदाचा मान सौ रंजना टवळे यांना दिल्याने शेवटी त्यांची सरपंचपदासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.या निर्णय प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यलमार यांनी काम पाहिले.यावेळी आ. अनिकेतभाई तटकरे ,जेष्ठ नेते रामचंद्र चितळकर, प्रकाश थिटे,आंबेवाडी सरपंच सुरेश महाबळे,उपसरपंच श्रीकांत चव्हाण,माजी सरपंच प्रदीप चोरगे,माजी उपसरपंच संतोष टवळे,जनार्दन महाबळे,नारायण लाडगे,नथूराम जाधव,सदानंद जाधव,सुशील जाधव,केशव मोहिते, काशिनाथ चोरगे,काशिनाथ वातेरे,महादेव सानप,पुरणमल मोदी,शंकर मोदी मोहिते तसेच आदी प्रमुख कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रा.पं.हद्दीतील वैजनाथ खांब नडवली येथील ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व महिला व युवक कार्यकर्ते उपस्थित होते.